राजा शिवाजी हा चित्रपट १ मे रोजी रिलीज करण्यात आला.
राजा शिवाजी चित्रपटाची अजुनही चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
राजा शिवाजी चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ५२.६५ कोटी रुपयांची कमाई केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या कथा अनेक सिनेमांमधून दाखवण्यात आल्या. अनेक अभिनेत्यांनी त्यांच्या भुमिकाही साकारल्या. मात्र 'राजा शिवाजी' हा चित्रपट अनेकांच्या मनात घर करून राहिला. हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही मोठ्या पडद्यावर लोक अजुनही हाऊसफूल करतायेत. तिसऱ्या आठवड्याची राजा शिवाजीची कमाई बी १२.९५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. तर तिसऱ्या गुरुवारची कमाई ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
राजा शिवाजी चित्रपटाची पसंतीसध्या चित्रपटगृहात लोक चित्रपट पाहणं पसंत करत नाहीत. त्याऐवजी त्यांना ओटीटी हा पर्याय आवडतो. पण'राजा शिवाजी'हा चित्रपट पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतायेत असं आपण म्हणू शकतो. कारण चित्रपट रिलीज झाल्याच्या तिसऱ्या गुरुवारीही या चित्रपटाने ८५ लाख रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने आधीच १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे हा आकडा नक्कीच प्रेक्षकांना थक्क करणारा आहे. महत्वाचं म्हणजे हा चित्रपट सध्या सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरत आहे.
Chanakya Niti: खिशात पैसे शिल्लक राहत नाहीत, चाणक्यांनी सांगितल्या ५ गंभीर चूका राजा शिवाजी चित्रपटाची कमाई किती?रितेश देशमुखच्या या चित्रपटाची कमाईत चौथ्या विकेंडला चांगली वाढ होईल अशी शक्यता आहे. जर पुढेही हा ट्रेंड सुरुच राहिला तर हा चित्रपट ११० ते ११५ कोटी रुपयांपर्यंत पूर्ण करेल. यापुर्वी तान्हाजी, छावा यांसारख्या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. तान्हाजी या चित्रपटाने २५० कोटी तर छावा या चित्रपटाने ३०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष राजा शिवाजी चित्रपटाच्या कमाईकडे आहे. मात्र परदेशात या चित्रपटाने ०.१० कोटी रुपयांची कमाई केली. म्हणजेच ग्रॉस कमाई ही ४.१० कोटी रुपयांवर पोहचली आहे. पुढील माहितीत आपण तीन आठवड्यांचे कलेक्शन जाणून घेऊयात.
Raja Shivaji Box Office Collection: राजा शिवाजी चित्रपटाचे आत्तापर्यंतचे कलेक्शन किती?पहिला आठवडा ५२. ६५ कोटी रुपये कमाई झाली.
दुसरा आठवडा २४. ३० कोटी रुपये कमाई झाली.
तिसरा शुक्रवार १.६० कोटी रुपये कमाई झाली.
तिसरा शनिवार ३.०० कोटी रुपये कमाई झाली.
तिसरा रविवार ३.७५ कोटी रुपये कमाई झाली.
तिसरा सोमवार १.१५ कोटी रुपये कमाई झाली.
तिसरा मंगळवार १.५० कोटी रुपये कमाई झाली.
तिसरा बुधवार १.१० कोटी रुपये कमाई झाली.
तिसरा गुरुवार ०.८५ कोटी अशी अंदाजे कमाई झाली आहे.
म्हणजेच एकूण १०२.७० कोटी रुपयांची कमाई राजा शिवाजी चित्रपटाने केली आहे.
LPG Subsidy Status : LPG सबसिडीचे पैसे तुमच्या खात्यात आले का? या 5 सोप्या स्टेप्सने करा चेक