Drishyam 3: 'दृश्यम 3' मोडणार 'या' 4 सिनेमांचा रेकॉर्ड, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस पैशांचा पाऊस
Tv9 Marathi May 22, 2026 01:45 PM

Drishyam 3 Box Office Collection Day 1: मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी नुकताच 66 वा वाढदिवस साजरा केला. हेच निमित्त साधत ‘दृश्यम 3’ सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. पहिल्याच दिवशी सिनेमाने बक्कळ कमाई करत, 2026 मध्ये सर्वाधिक कमाई केलेल्या सिनेमांच्या यादीत एन्ट्री केली आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडला आता शनिवार आणि रविवार असल्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाच ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाचं बजेट 100 कोटी रुपये आहे. तर सिनेमा पहिल्यात आठवड्यात 100 कोटींचा गल्ला ओलांडेल असं देखील सांगण्यात येत आहे.

‘दृश्यम 3’ सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन

बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, मोहनलाल स्टारर‘दृश्यम 3’ ने भारतात पहिल्याच दिवशी 15.85 निव्वळ कमाई केली आहे. भारतातील एकूण कमाई 18.37 कोटी झाली आहे. जगभरातील एकूण कमाई 43.37 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

2026 मधील पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारे 5 सिनेमे

IMdb नुसार, भारतात पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ‘धुरंधर द रिवेंज’ सिनेमा आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी 205.2 कोटी रुपयांचा गल्ला जमा केली. दुसऱ्या क्रमांकावर प्रभास स्टारर ‘द राजा सहाब’ सिनेमा आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी 100.6 कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या क्रमांकावर ‘मन शंकरा वारा प्रसाद गारू ‘ सिनेमा असून त्याने 71.2 कोटींपर्यंत मजल मारली. चौथ्या क्रमांकावर ‘उस्ताद भगत सिंह’ सिनेमा आहे, सिनेमाने पहिल्याच दिवशी 48.2 कोटी रुपये कमावले. तर पाचव्या क्रमांकावर ‘दृश्यम 3’ सिनेमा आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी 43 कोटींची कमाई केली आहे. आता ‘दृश्यम 3’ सिनेमा या चार सिनेमांपैकी कोणत्या सिनेमाला मागे टाकतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘दृश्यम 3’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘दृश्यम 3’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्या खांद्यावर होती. ‘दृश्यम 3’ 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम 2’ सिनेमाचा सिक्वल आहे… ‘ दृश्यम 3’ सिनेमाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. सिनेमात मोहनलाल यांच्यासोबतच मीना, अंसिबा हसन, एस्थर अनिल, मुरली गोपी, सिद्दीकी आणि आशा शरथ यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.