छत्रपती संभाजीनगरातील तरुण अभिजीत दीपके याने सोशल मीडियावर सुरू केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या मोहिमेची सध्या राज्यभर चर्चा रंगली आहे. बेरोजगार तरुणांबाबत सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यावर उपरोधिक टीका म्हणून अभिजीतने ही मोहीम सुरू केली. मात्र, या वाढत्या प्रसिद्धीमुळे त्याच्या आई-वडिलांची चिंता वाढली असून त्यांनी मुलाने राजकारणापासून दूर राहावे, अशी भावना व्यक्त केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिजीतची आई अनिता दीपके म्हणाल्या, “अभिजीतने ही चळवळ आता थांबवावी आणि राजकारणात जाऊ नये. गेल्या दोन दिवसांपासून आम्हाला झोप लागलेली नाही. आम्हाला १७ तारखेला त्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी त्याला आम्ही फोन केला होता. मात्र, त्याच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. त्याची वाढती प्रसिद्धी आणि त्यातून उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीची भीती वाटते.”
Cockroach Janata Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला कोणाचं फंडिंग? राजकीय वाटचाल कशी असणार, अभिजीत दिपकेंनी सगळचं सांगितलं; "मी तर अमेरिकेत"त्या पुढे म्हणाल्या की, अभिजीत लहानपणापासून शांत आणि अभ्यासू स्वभावाचा होता. त्याने पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते, मात्र ते अर्धवट सोडून नंतर पत्रकारितेकडे वळला. “१७ तारखेला आम्हाला ‘कॉकरोच जनता पार्टी’बद्दल समजलं. त्यावेळी आम्ही त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण बोलणं होऊ शकलं नाही,” असे त्यांनी सांगितले.
अभिजितला दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या टीमकडूनही बोलावणे आले होते, अशी माहिती अनिता दीपके यांनी दिली. “आम्ही राजकारणी लोक नाही. अभिजितने मोठा अधिकारी व्हावं, अशी आमची इच्छा होती. त्याने साधं आयुष्य जगावं, असंच आम्ही त्याला नेहमी सांगत आलो,” असेही त्या म्हणाल्या.
Abhijeet Dipke : मोदींना देव बनवून ठेवलंय... व्यवस्थेविरोधात युवकांची बंडखोरी! Cockroach Janta Party चे अभिजीत दिपके Exclusiveअभिजीतचे वडील भगवान दीपके यांनीही मुलाबद्दलची चिंता व्यक्त केली. “आई-वडील म्हणून भीती वाटते. कुणाला उचलून नेतात, अटक करतात, अशा बातम्या पाहिल्यावर काळजी वाढते. सरकार काहीही करू शकतं, अशी भावना मनात येते,” असे ते म्हणाले.
“अभिजीतने एका माध्यमाशी बोलताना ‘भारतामध्ये गेलो तर तुरुंगात टाकतील’ अशी भीती व्यक्त केली होती. संजय राऊत आणि संजय सिंह यांनाही अटक झाली होती, नंतर न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. पण अशा बातम्या पाहिल्यावर पालक म्हणून भीती वाटते.” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.