कोलकता: पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व मदरशांमध्ये प्रार्थनेच्या वेळी ‘वंदे मातरम्’ म्हणणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून, हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.
Raj Thackeray: राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख सदावर्तेंना भोवला; “जरा जपून फिरा” म्हणत राजू पाटलांचा इशारा, रवींद्र चव्हाणांनाही टोला..मदरसा शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, हा निर्णय सरकारी मॉडेल मदरसे, सरकारी अनुदानित मदरसे, मान्यताप्राप्त शिशू शिक्षण केंद्र, माध्यमिक शिक्षण केंद्र तसेच अल्पसंख्याक व्यवहार आणि मदरसा शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील विनाअनुदानित मान्यताप्राप्त मदरशांना लागू असेल.
आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, वर्ग सुरू होण्यापूर्वी प्रार्थना सभेदरम्यान ‘वंदे मातरम्’चे गायन करणे बंधनकारक असेल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विविध संस्थांमधील प्रार्थना पद्धतींमध्ये एकसमानता आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर हा आदेश तत्काळ अंमलात आणण्यात आला आहे. याआधी राज्य सरकारने १३ मे रोजी असाच आदेश दिला होता.
पूर्वपरवानगी शिवाय माहिती देऊ नकाकोलकता : पश्चिम बंगाल सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या आचारसंहितेची पुन्हा आठवण करून देणारे परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार कोणतीही अधिकृत कागदपत्रे किंवा माहिती शासनाची परवानगी न घेता प्रसारमाध्यमांना देण्यास तसेच राज्य किंवा केंद्र सरकारच्या धोरणांवर सार्वजनिक टीका करण्यास मनाई करण्यात आली आहे.
farmer Success Story: पहिल्याच वर्षी 20 टन केशर आंब्याचे उत्पादन; मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या शेतात बहरली आंबराई!मुख्य सचिव कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात अखिल भारतीय सेवा, पश्चिम बंगाल नागरी सेवा, पश्चिम बंगाल पोलीस सेवा आणि इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवरील विद्यमान आचारनियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे म्हटले आहे. ‘‘प्रसारमाध्यमांशी संवाद आणि माहिती प्रसारित करण्यासंबंधी आचारनियमांमध्ये आधीपासूनच नमूद केलेल्या तरतुदींची कर्मचाऱ्यांना आठवण करून देणे, हा यामागील उद्देश आहे,’’ असे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.या परिपत्रकात, सरकारी कर्मचाऱ्यांना कोणतीही अधिकृत माहिती किंवा कागदपत्रे थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्रसारमाध्यमांना देण्यास मनाई केली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.