Is Kangana Ranaut Married Secretly: बॉलिवूडची (Bollywood News) डॅशिंग अभिनेत्री आणि लोकसभा खासदार (Member of Parliament) कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच चर्चेत असते. कधी ती कुणावर तरी आगपाखड करताना दिसते, तर कधी तिची वक्तव्य चर्चेचा विषय ठरतात. पण, यावेळी कंगना आपल्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री आणि राजकारणी कंगना रनौत नुकतीच एका पूर्णपणे वेगळ्याच लूकमध्ये दिसून आली. एखाद्या नववधूप्रमाणे कंगनानं गळ्यात मंगळसूत्र आणि हातात हिरवा चुडा घातला होता. कंगनाचा हा लूक फार कमी वेळातच व्हायरल झाला. तिचा हा बदललेला अंदाज पाहून चाहते पुरते अवाक् झालेत. अविवाहित असलेल्या कंगनानं गळ्यात मंगळसूत्र कसं घातलं? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर, अनेकजण अरे हिनं गुपचूप लग्न उरकलंय, असं म्हणत आहेत.
कंगनानं लग्न केलंय का? कुणासोबत लग्न केलं? हे कधी घडलं, कसं घडलं आणि याबाबत कोणालाच कशी काहीच माहिती मिळाली नाही? कंगनानं अशा प्रकारे गुपचूप गोष्टी करायला कधीपासून सुरुवात केली? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत. खरं तर कंगनानं लग्न केलेलं नाही. आता तुम्ही म्हणाल की, व्हायरल होणार्या व्हिडीओमध्ये तर तसंच दिसतंय. मग नेमकं सत्य काय? सविस्तर जाणून घेऊयात...
View this post on Instagram
कंगनाचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये तिच्या गळ्यात 'मंगळसूत्र', मनगटावर हिरव्या बांगड्या आणि कपाळावर लाल टिकली लावलेले दिसतेय. कंगनानं एक साधा हलक्या गुलाबी रंगाचा ड्रेस वेअर केलाय. तर, केसांची एक वेणी बांधली आहे. तर, डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगल वेअर केलाय. कंगना एका गेटमधून बाहेर पडते आणि पॅपाराझींना पाहून पटकन जाऊन गाडीत बसते.
कंगनाचा हा लूक एखाद्या नववधूसारखा आहे. तरी प्रत्यक्षात तिनं गुपचूप लग्न केलेलं नाही. मग, कंगनानं नववधू लूक का केलाय? मीडिया रिपोर्टनुसार, कंगनाचा लूक एका शुटिंगवेळचा आहे. तिचा आगामी सिनेमा 'तन्नू वेड्स मन्नू 3' (Tanu Weds Manu 3)च्या शुटिंगवेळचा आहे.
कंगना रनौत हिचा हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर चर्चांना अक्षरशः उधाण आलं. व्हिडीओमध्ये तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसल्यानं अनेक चाहत्यांनी तिनं गुपचूप लग्न उरकलं का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये "कंगनानं लग्न केलंय का?", "हे मंगळसूत्र कशासाठी?" अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. तर काहींनी हा एखाद्या सिनेमाच्या शुटिंगचा भाग असू शकतो, असा अंदाज व्यक्त केलाय. काही समर्थकांनी तर "तिनं गुप्तपणे लग्न केलं असलं तरी त्यात काय चूक आहे? ते तिचं वैयक्तिक आयुष्य आहे,” अशा प्रतिक्रिया दिल्या.
मात्र, उपलब्ध माहितीनुसार कंगना रणौतने गुप्तपणे लग्न केलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांनी चिंता करण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कंगना तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. ती स्वतःच्या अटींवर आयुष्य जगते आणि इतरांच्या मतांची फारशी पर्वा करत नाही.
कंगनाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, कंगना 'तन्नू वेड्स मनू 3', 'क्वीन 2', 'सर्कल' आणि तिच्या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार होणारा 'भारत भाग्य विधाता' अशा प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. यापूर्वी ती इमर्जन्सी या सिनेमात झळकली होती. या सिनेमात तिनं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.
ABP माझाच्या बातम्या LIVE...