एकीकडे आखातात युद्ध सुरु असताना संयुक्त अरब अमिरातने त्यांच्या देशातून २००० पाकिस्तानी नागरिकांना हाकलून लावले आहे. या पाकिस्तानींकडून त्यांचे पैसे आणि सामान देखील जप्त घेतल्याचे म्हटले जात आहे. युईएच्या कारवाईने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. गुरुवारी पाकिस्तानच्या संसदेत या प्रकरणावरुन विरोधकांना पाकिस्तानी सरकारला चांगलेच घेरले. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारने या प्रकरणात एक चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली. अलिकडच्या दिवसात पाकिस्तान आणि युएई यांचे संबंध बिघडले आहेत. पाकिस्तानने सौदी अरबचे खुले समर्थन केल्याने युएई भडकला आहे.
डॉन वृत्तपत्राच्या बातमीनुसार संसदेची कारवाई जशी सुरु झाली तसे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी २००० पाकिस्तानींना युएईतून हाकलण्याचा मुद्दा उपस्थित केला.पाकिस्तानी नागरिकांवर युएईने आधी अत्याचार केला आहे. त्यानंतर त्यांची पाठवणूक केली आहे. त्यांचे सामान आणि पैसे देखील जप्त केल्याचे पाकच्या खासदारांनी संसदेत सांगत या प्रकरणात सरकारने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
1. पाकिस्तान सरकारच्या मते गेल्या ५ वर्षांत १ लाख ६४ हजार पाकिस्तानींना अरब देशातून जबरदस्ती निर्वासित केले आहे. यात सौदी अरबमधून १ लाख आणि युएईतून सुमारे ६४ हजार पाकिस्तानींना निर्वासित केले आहे.
2. पाकिस्तान सरकारच्या परराष्ट्र विभागाने संसदेत सांगितले की ज्या लोकांना युएईतून हुसकावून लावले आहे, त्यांच्यावर गुन्हेगारीचे प्रकरणे आहेत. काही लोक युएईत घुसखोरी करुन भिक मागत होते, त्यामुळे त्यांना हुसकावून लावले आहे. युएईत अजूनही २० लाख पाकिस्तानी काम करत आहेत.
3. न्यूयॉर्क टाईम्सने ८ मे रोजी एक बातमी आली होती. त्यात म्हटले होते की पाकिस्तानच्या शिया समुदायाचे जे लोक युएईत काम करत होते, त्यांना अबूधाबीतून पळवले आहे. हेरगिरीच्या भीतीने युएईने हे पाऊल मिळाले आहे.
4. पाकिस्तानचे २० लाख कामगार युएईत काम करत आहेत, जे काम करुन दरवर्षी ८ अब्ज डॉलर इस्लामाबादला पाठवतात. यामुळे पाकिस्तानच्या विकासात मदत मिळत आहे. युएईला तेथील कामगार कमी करायचे आहेत.
संयुक्त अरब अमिरात आतापर्यंत पाकिस्तानचा सहकारी म्हटले जात आहे. मात्र, इराण युद्धात ज्या प्रकारने पाकिस्तानने भूमिका घेतली, त्यामुळे दोन्ही देशांचे नाते बिघडले. युएई पाकिस्तानकडून २ कारणांनी नाराज आहे. पहिले कारण, पाकिस्ताने युद्धा दरम्यान सौदी अरबला सैन्य मदत दिली, मात्र, युएईसाठी कोणतीही भूमिका घेतली नाही.
दुसरे कारण पाकिस्तानचा मध्यस्थ म्हणून प्रयत्न. पाकिस्तानने इराण युद्धात जेव्हा सीजफायर करण्यासाठी पुढाकार घेतला तेव्हा त्याने युएईला कोणतीही विचारणा केली नाही. हे युएईला आवडले नाही. त्याने लागलीच पाकिस्तानला दिलेले कर्ज मागितले. पाकिस्तानने सौदीच्या मदतीने युएईचे कर्ज फेडले आहे.