NEET UG Paper Leak Case Maneesha Havaldar Arrested नवी दिल्ली / पुणे : देशभर गाजत असलेल्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नीट पेपर लीक प्रकरणात आणखी एका मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक करणाऱ्या मनीषा संजय हवालदार नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. मनीषाने हवालदार या महिलेनं नीट यूजी परीक्षेतील भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केले होते.
मनीषा हवालदार सध्या पुण्यातील सेठ हिरालाल सर्फ प्रशाला येथे कार्यरत होती. सीबीआयने तिला पुण्यातून अटक केली आहे. एनटीएने तिला पेपर प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्त केले होते. तिच्याकडे भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोचू शकत होती. यापूर्वी अटक झालेल्या मनीषा मांढरेसोबत मिळून तिने भौतिकशास्त्राचे काही प्रश्न लीक केले होते. हे सर्व प्रश्न तपासण्यात आले आणि हेच लीक झालेले प्रश्न नीटच्या पेपरमध्ये आल्याचे आढळले.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून 3 मे रोजी नी यूजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा पेपर फुटल्याचं समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली असून आता परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडून करण्यात येत आहे. सीबीआयनं पेपरफुटीसंदर्भात चौकशी आणि अटकसत्र सुरु ठेवलं आहे. यात अकरावी अटक करण्यात आली आहे. ही अटक पुण्यातून करण्यात आली असून पुण्यातून मनीषा हवालदार या महिलेला अटक करण्यात आलं आहे.
या प्रकरणात सीबीआयने देशभरातील विविध ठिकाणी छापेमारी केली असून अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट्स आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त साहित्याचे सविस्तर विश्लेषण सुरू आहे. तपासात प्रश्नपत्रिका लीक होण्याचा मूळ स्रोत समोर आला असून, लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांना विशेष कोचिंग क्लासेसमध्ये प्रश्न पुरवणाऱ्या दलालांनाही ओळखून अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून अटक :
मनीषा हवालदार - CBI
शिवराज मोटेगावकर - CBI कोठडी
प्रल्हाद कुलकर्णी - CBI कोठडी
मनीषा मांढरे - CBI कोठडी
मनीषा वाघमारे - CBI कोठडी
शुभम खैरनार - CBI कोठडी
धनंजय लोखंडे - न्यायालयीन कोठडी
दुसऱ्या राज्यातून झालेली अटक :
दिनेश बिवाल - न्यायालयीन कोठडी
मांगीलाल बिवाल - न्यायालयीन कोठडी
विकास बिवाल - न्यायालयीन कोठडी
यश यादव - न्यायालयीन कोठडी
आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे.