आयपीएल स्पर्धेत अभिषेक शर्मा फलंदाजीला आला की काही ना काही विक्रम मोडणार हे ठरलेलं असतं. आरसीबीविरुद्धच्या सामन्यातही तसंच झालं. त्याने 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तसेच 22 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. (Photo: IPL/BCCI)
आयपीएलच्या पर्वात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वैभव सूर्यवंशी आघाडीवर आहे. त्याने 53 षटकार मारले आहेत. तर 43 षटकारांसह अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. फिरकीविरूद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम अभिषेकच्या नावावर आहे. त्याने एकूण 18 षटकार मारले आहेत. (Photo: IPL/BCCI)
अभिषेक शर्माने आयपीएलच्या इतिहासात सातव्यांदा 250 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केले. हा पराक्रम करणारा एकमेव खेळाडू आहे. निकोलस पूरनने पाच सामन्यांमध्ये असे केले आहे. वैभव सूर्यवंशी, ट्रेव्हिस हेड आणि कायरोन पोलार्ड यांनी प्रत्येकी चार वेळा हा पराक्रम केला आहे. (Photo: IPL/BCCI)