Maharashtra Weather Update: हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात (Vidarbha) सूर्य अक्षरशः आग ओकताना दिसत आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी (Brahmapuri) हे देशात सर्वाधिक तप्त शहर ठरलं आहे. ब्रह्मपुरीत काल (22 मे) शनिवार 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील दोन दिवस विदर्भात (Vidarbha Heat Wave) उष्णतेचे तडाखा असाच कायम राहणार असल्याची शक्यात वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट जारी केला असून अकोला, अमरावतीसह वर्धेला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. संभाव्य उन्हाचा तडाखा लक्ष्यात घेता दुपारच्या वेळेत कामा शिवाय बाहेर पडणं टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Heat Wave: विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट,
शहर तापमान
ब्रह्मपुरी 47.2
चंद्रपूर 46.4
वर्धा 47.0
नागपूर 45.7
अमरावती 46.4
अकोला 44.8
यवतमाळ 45.4
गडचिरोली 46.0
भंडारा 42.0
गोंदिया 44.9
Vidarbha Heat Wave: अकोला, अमरावती आणि वर्ध्यामध्ये आज तापमानाच्या 'रेड अलर्ट'
विदर्भातील अकोला अमरावती आणि वर्धेमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा 'रेड अलर्ट' देण्यात आलाय. मात्र अकोलेकरांसाठी या तीन दिवसातील दिलासादायक गोष्ट म्हणजे अकोल्याचं कमी झालेलं तापमान. रेड अलर्ट च्या पहिल्या दिवशी अकोल्याचा पारा थेट 45. 2 अंशांवरून 44.9° वर आलाय. तर काल हाच पारा 44.8° वर होताय. या हंगामात अकोल्याचा सर्वाधिक तापमान 46.9 नोंदवण्यात आलंय. गेल्या तीन दिवसातील रेड अलर्ट इचार्यानंतर अकोला चा तापमान कमी झालं असलं तरी वातावरणातील कोरडेपणा मात्र वाढलाय. यामुळे वातावरणातला मात्र मोठ्या प्रमाणात वाढलाय. तिकडे रीडरच्या पहिल्या दोन दिवसात अमरावती आणि वर्धेचा तापमान मात्र वाढलंय.
23 मे 2026: अकोला, अमरावतीसह वर्ध्याला तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर यवतमाळ, नागपूर, चंद्रपूरला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर तिकडे भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अलर्ट देण्यात आले असून या ठिकाणी उष्णतेची लाट असणार आहे.
24 मे 2026: अकोला, अमरावती यवतमाळसह वर्ध्याला रेड अलर्ट देण्यात आले असून या शहरात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर नागपूर आणि चंद्रपूरला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर तिकडे भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अलर्ट देण्यात आले असून या ठिकाणी उष्णतेची लाट असणार आहे.
25 मे 2026: नंतर उष्णतेची लाट काही प्रमाणत सौम्य होण्याची शक्यात आहे. अकोला, अमरावती यवतमाळसह वर्ध्याला या दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आले असून या शहरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूरला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर तिकडे भंडारा, गोंदिया वाशिम आणि बुलढाण्याच्या कुठलाही अलर्ट नसणार आहे. संभाव्य उष्णतेची लाट लक्ष्यात घेता नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात पावसाच्या आगमनाचे चाहूल देणारे संकेत (Monsoon in Konkan Region)
तर दुसरीकडे, कोकणात सध्या पावसाच्या आगमनाचे चाहूल देणारे संकेत दिसत आहेत. कोकणातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी देखील बरसत आहेत. ढगाळ वातावरण, पावसाची एखादी सर, असं वातावरण सध्या कोकणात आहे. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे उकाडा देखील जास्त प्रमाणात जाणवू लागला आहे. तर कोणत्याही क्षणी मान्सूनच्या आगमनाची वार्ता मिळेल, असं चित्र सध्या कोकणात बघायला मिळत आहे.
Satara News :साताऱ्यातील नागठाणे येथे वीज पडून मेंढपाळाचा मृत्यू
सातारा-कराड मार्गावरील नागठाणे, उंब्रज, तासवडे टोलनाका परिसरात सायंकाळी झालेल्या पावसाने एका मेंढपाळाचा बळी घेतला. नागठाणे, अतित गावच्या हद्दीवर वीज पडून तुकाराम सिधु होनमाने (वय 65) यांचा मृत्यू झाला. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील होते. तुकाराम होनमाने हे आपल्या मेंढ्यांसाठी भुईमूगाचे वेल गोळा करत असताना विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. यावेळी ते शेतातील झाडा जवळ थांबले होते. त्याचवेळी विजेचा लोळ खाली आला अन् ते ज्या झाडाखाली उभे होते त्या झाडासह होनमाने यांच्या अंगावर वीज कोसळली यात ते जागीच ठार झाले. तुकाराम होनमाने हे पुढील दोन दिवसात आपल्या सोलापूर जिल्ह्यातील गावी परतणार होते.पंरतू त्यापूर्वी पावसाने त्यांचा बळी घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या