प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन
वयाच्या ५२ व्या वर्षी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास
मनोरंजन विश्वावर शोककळा
मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले. '30 Rock' ड्रामामुळे गाजलेल्या सिटकॉममधील कामासाठी विशेष ओळखले जाणारे अभिनेते ग्रिझ चॅपमन (Grizz Chapman) यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याने वयाच्या ५२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते अमेरिकन टिव्हीचे प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडायचा.
TMZ च्या वृत्तानुसार, अभिनेतेग्रिझ चॅपमन (Famous Television Actor Grizz Chapman Passes Away ) यांचे शुक्रवारी म्हणजेच २२ मे ला निधन झाले. अभिनेत्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी अभिनेत्यावर श्रद्धांजलीवाहिली आहे. अभिनेत्याच्या मृत्यूचे अधिकृत वैद्यकीय कारण अद्याप जाहीर करण्यात आले नाही. परंतू ते दीर्घकाळापासून गंभीर मूत्रपिंडाच्या विकाराशी लढा देत होते आणि अनेक वर्षांपासून त्यांच्यावर डायलिसिसचे उपचारसुरू होते, अशी माहिती अनेक माध्यमांच्या अहवालातून समोर आली आहे.
अभिनेते ग्रिझ चॅपमन यांची कारकीर्दग्रिझ चॅपमन यांनी 'Grizz Chroniclez' नावाची एक यूट्यूबवर व्हिडीओची सीरिज देखील तयार केली होती. ज्यात त्यांनी विनोदी शॉर्ट नाटकांचे व्हिडीओ शेअर केले आहेत. अभिनेत्याने 'Blue Bloods', 'The Good Fight' आणि 'The Black List' यांसारख्या चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केले आहे. अभिनेत्याच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे.
Cannes Model Attack: 'कान्स'मध्ये मॉडेलवर हल्ला; रक्तबंबाळ चेहरा अन् शरीरावर जखमा, VIDEO पाहून उडेल थरकाप