Cockroach Janta Party Website Taken Down: 'कॉकरोच जनता पार्टी' (Cockroach Janta Party) या इंटरनेटवर व्हायरल झालेल्या चळवळीची वेबसाईट बंद पाडण्यात आली आहे. पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेनं केंद्र सरकारवर हल्लाबोल निशाणा साधला असून याला सरकारचा 'हुकूमशाही' कारभार म्हटले आहे. "सरकार झुरळांना इतके का घाबरत आहे?" असा सवाल अभिजितने X (ट्विटर) वर उपस्थित केला आहे. कॉकरोच वेबसाईटवर जवळपास 10 लाख लोकांनी सदस्य म्हणून नोंदणी केली होती. NEET-UG पेपर फुटीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 6 लाख सदस्यांनी एका याचिकेवर स्वाक्षरी केली होती.
The government has taken down our iconic website - https://t.co/l6i6Ry8h5S.
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) May 23, 2026
10 Lakh cockroaches had signed up on our website has members.
6 Lakh cockroaches had signed a petition to demand the resignation of Dharmendra Pradhan.
Why is the government so scared of cockroaches?…
कॉकरोच जनता पार्टी व्यंगात्मक (sarcasm) आणि मीम-आधारित डिजिटल चळवळ असून, व्यवस्थेवर टीका करण्यासाठी मिलेनियल्स आणि जेन-झेड (Gen Z) तरुणांमध्ये ती प्रचंड लोकप्रिय झाली आहे. अभिजितने वैयक्तिक इन्स्टाग्राम अकाउंट आणि पार्टीचे सोशल मीडिया पेज दोन्ही हॅक करण्यात आल्याचे ट्विट करत सांगितलं आहे. आपण सध्या नवीन वेबसाईट बनवण्यावर काम करत असून, "कॉकरोच कधीही मरत नाहीत" (Cockroaches never die) असा इशारा दिला आहे.
You can hack and withhold the accounts but you cannot hack this movement.
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) May 23, 2026
We are not going to stop and we will keep raising our voice against this autocracy. Every attack makes cockroaches stronger.
We are working on a plan to get this movement to continue sustainably and take… pic.twitter.com/35mJ3hCBQo
या ट्रेंडची सुरुवात भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांच्या एका सुनावणीदरम्यान चुकीच्या पद्धतीने उद्धृत केल्या गेलेल्या 'कॉकरोच ' या विधानावरून झाली होती. त्यानंतर त्याचे रूपांतर व्यवस्थेवर विनोद आणि टीका करणाऱ्या तरुणांच्या एका इंटरनेट बंडात झाले.
इतर महत्वाच्या बातम्या