Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला
esakal May 24, 2026 01:45 AM

Kerala monsoon arrival : मॉन्सून २८ मे रोजी संपूर्ण अंदमान बेटे, श्रीलंकेच्या काही भागांसह कोमोरिन भागात आगमन केली होती. त्यानंतर तब्बल पाच दिवस थबकलेली वाटचाल पुन्हा सुरु करत आज मॉन्सूनने प्रगती केली असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मॉन्सूनने १६ मे रोजी यंदाच्या हंगामाला सुरुवात केल्यानंतर वेगाने प्रवास सुरु केला होता. त्यानंतर संपूर्ण अंदमान-निकोबार बेटे, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राच्या आणखी काही भागासह देशाच्या दक्षिणेकडील आणि श्रीलंकेच्या पश्चिमेकडे असलेल्या कोमोरिन भागात मॉन्सूनने प्रगती केली होती. या प्रवासानंतर मॉन्सून काही काळ थबकला होता.

शनिवारी मॉन्सूननेश्रीलंकेचा निम्म्याहून अधिक भाग, नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह, अंदमान समुद्राचा बहुतांश भाग व्यापला आहे.

Monsoon In Goa Konkan : मॉन्सून गोवा, कोकण किनारपट्टीवर दाखल? राज्यात ४ दिवस वादळी पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

दरम्यान २६ मेपर्यंत मॉन्सून केरळात दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. केरळमध्ये दाखल झाल्यावर त्याची पुढील वाटचाल स्पष्ट होईल. याबाबत मे महिन्याच्या अखेरीस हवामान विभागाकडून मॉन्सून पावसाचा सुधारित अंदाज जाहीर करण्यात येईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.