Gold-Silver Price Today: देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे (Diesel Price) भाव पुन्हा एकदा कडाडले आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेल दरात चारवेळा वाढ झाली आहे. अशातच आज (सोमवारी) देशभरात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. त्यानुसार आता पेट्रोलचे दर 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ (Petrol And Diesel Prices Rise) झाली आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आज सराफाबाजारात सोन्या-चांदीच्या (Gold-Silver Price) दरात देखील वाढ झाल्याचे बघायला मिळाले आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका आता बसणार आहे. (Gold-Silver Price Today)
सराफा बाजारात काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर? (Gold-Silver Price Today)
दरम्यन, जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. काल हेच दर 1,65,500 वर होते. तर त्यात आता पाचशे रुपयांची वाढ होऊन हे दर 1, 57,000 हजार रुपयावर पोहचले आहेत. तर चांदीचे कालचे आणि आजच दर 27 हजार रुपयांवर कायम आहेत.
चांदीच्या दरवाढीचा अधिकमासाच्या खरेदीवर परिणाम (Silver Price Today)
अधिकमासाच्या निमित्ताने सासरकडून लेक जावयाला चांदीच्या वस्तू वाण म्हणून भेट देण्याची हिंदू संस्कृतीमध्ये प्रथा आहे. यंदा मात्र चांदीचे दर मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल एक लाखाहून अधिक रुपयांनी वाढले असल्याचे चित्र आहे. परिणामी, जावयाला वान देणे आता सासऱ्याला ताण झाले आहे. चांदीच्या किमती वाढल्याने यंदा जावयाला वान द्यायचे असले तरी किंमती आवाक्या बाहेर गेल्याने, बजेट बिघडून वाण देताना आता ते बजेट नुसार कमी वजनाचे आणि कमी किंमतीचे द्यावे लागत आहे. अधिकमासाच्या निमित्ताने चांदीचे वाण दिले जात असल्याने यासाठी ग्राहक वाढले आहेत. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत मोठी दरवाढ झाल्याने कमी किंमतीचे चांदीचे वाण ग्राहक खरेदी करत असल्याच्या प्रतिक्रिया सुवर्ण व्यावसायिकांनी दिली आहे.
Petrol And Diesel Prices Rise: सोन्या-चांदीच्या किमती का वाढत आहेत?
सोन्या-चांदीच्या किमती वाढण्यामागे भू-राजकीय तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता हे सर्वात मोठे कारण आहे. जेव्हा जगात युद्ध किंवा राजकीय अस्थिरता असते, तेव्हा शेअर बाजार कोसळण्याची शक्यता असते. अशा वेळी, गुंतवणूकदार आपली सुरक्षा जपण्यासाठी इक्विटीमधून पैसे काढून सोन्या-चांदीमध्ये गुंतवतात. डॉलरच्या कमकुवतपणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने बाळगण्याचा खर्च कमी होतो. याशिवाय, देशांतर्गत बाजारातील सोन्याची आयात आणि डॉलरचा बहिर्वाह नियंत्रित करण्यासाठी भारत सरकारने सोन्यावरील आयात शुल्क ६% वरून १५% पर्यंत वाढवले आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीमुळे परदेशातून सोने आयात करणे अधिक महाग झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या