Pravin Tarde : 'देऊळ बंद 2' चित्रपट बनवण्यामागचं मुख्य कारण आलं समोर, अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर प्रवीण तरडेंनी सर्वकाही सांगितले
Saam TV May 25, 2026 03:45 PM

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला.

'देऊळ बंद २' च्या टीमने अंबाबाईचे दर्शन घेतले.

प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २' बनवण्यामागचे मुख्य कारण सांगितले.

रणजीत माजगावकर- कोल्हापूर, साम टीव्ही प्रतिनिधी

'देऊळ बंद 2' चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेता रमेश परदेशी यांच्यासह अन्य कलाकारांनीही देवीचे आशीर्वाद घेतले. या चित्रपटाला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्याच पार्श्वभूमीवर कलाकारांनी कोल्हापूरच्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) चे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

View this post on Instagram