'इंडस्ट्रीतला कलंक, अभिनयात कच्चा, पण लबाडीत एक नंबर', अभिनेते विजय पाटकरांवर मेघराज राजेभोसलेंचा घणाघात
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क May 25, 2026 04:43 PM

Meghraj Raje Bhosale Criticized Vijay Patkar Film Corporation Elections: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत (All India Marathi Film Corporation Election) विजय पाटकर (Vijay Patkar) यांनी राजकीय हस्तक्षेप आणि दमबाजीचे आरोप केले आहेत. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरू दिला गेला नाही असा आरोप केला. त्यांनी विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले (Meghraj Raje Bhosale) आणि एका मंत्र्यांच्या ओएसडीवर गंभीर सवाल उपस्थित केले असून, मेघराज राजेभोसले यांनीही पाटकरांवर पलटवार केला आहे. 

मेघराज राजेभोसले बोलताना म्हणाले की, "विजय पाटकर हा इंडस्ट्रीतला कलंक, अभिनयामध्ये कच्चा आहे, पण लबाडीमध्ये एक नंबर आहे... एका वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विजय पाटकर यांनी लोकांना फसवलं... अनुदान देतो म्हणून अनेकांना फसवलं, ते आज लोक माझ्याकडे येतात... जनरल बॉडीमधून पळपुटा अध्यक्ष म्हणून विजय पाटकर प्रसिद्ध झाला... चार दिवसांत 60 जणांनी फॉर्म भरला... 40 विरोधी पक्षातल्या लोकांनी अर्ज भरला, कुठला मंत्री आणि कुठला ओएसडी होता, ज्यानं तुला फॉर्म भरू दिला नाही?" 

"विजय पाटकर यांनी एका वर्षाच्या कारकिर्दीत स्वतःला 5 चित्रपट मिळवले, एका चित्रपट दिग्दर्शकानं निर्माता आणला की, त्या निर्मात्याला पळवून लावणारा हा विजय पाटकर आहे... 10 लाख 75 हजारांच्या भ्रष्टाचारात चॅरिटीनं त्याला दोषी ठरवलंय... 19, 20 आणि 21 तारखेला 60 लोकांनी निवडणुकीसाठी अर्ज केले. यांच्यात हिंमत नव्हती, अनेक कारनामे समोर आले, त्यामुळे यांनी फॉर्म भरले नाहीत. नियोजित होणारी निवडणूक यांच्यापुढे पुढे ढकलली. त्यानंतर 10 जूनला याबाबत निकाल येणार होता, त्यापूर्वी यानं निवडणूक लावावी यासाठी प्रयत्न केले... फॉर्म भरताना कुठला मंत्री किंवा त्यांचा ओएसडी होता. आम्ही निलम शिर्के यांच्याशी संपर्क केला त्यांनी होकार कळवला... यात कुठेही राजकारणी लोकांशी संबंध आला नाही. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानं आपण फॉर्म भरला नाही...", खोटे आरोप करून पाटकर दिशाभूल करत असल्याचा आरोप मेघराज राजेभोसले यांनी केला आहे. 

अभिनेते विजय पाटकरांनी काय आरोप केलेत? (Vijay Patkar On Meghraj Raje Bhosale Criticized)

मराठी अभिनेते विजय पाटकर म्हणाले की, "मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत मी उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता मात्र राजकारण करून काही लोकांनी माझा उमेदवारी अर्ज भरू दिला नाही. एका मंत्र्यांचा ओएसडी मागच्या 4 दिवसापासून कोल्हापूरात आहे आणि तो लोकांवर दबाव आणतोय. त्यांच्या वतीनं हा व्यक्ती नको तो व्यक्ती नको असं सांगितलं जात आहे. मोठा दबाव आणला जात आहे. मला कळत नाही त्या मंत्र्याला आणि ओएसडी यांची विधानभवनातील सगळी कामं संपलीत का? जेणेकरून ते चित्रपट महामंडळात ठाण मांडून बसले आहेत..."

पुढे बोलताना अभिनेते विजय पाटकर म्हणाले की, "माझा आक्षेप मेघराज राजेभोसलेंवर आहे. त्याला लाज वाटायला पाहिजे मागील 10 वर्ष काय केलं. महामंडळाच अक्षरशः थडग केलं यानं. 7 महिने कर्मचाऱ्यांचा पगार देखील दिला नाही. उलट मला फोन करतोय आणि म्हणतोय माझा पॅनल मधून उभे रहा. याला लाज कशी वाटत नाही. मी काय माती खाल्ली आहे का? याच्या पॅनल मधून उभा राहायला..."

"मागील 40 वर्ष आम्ही इंडरस्ट्रीत आहोत. आम्ही कधी राजकारण्यांकडे येतो का? त्यांनी कशाला इकडे यायला हव? निलम शिर्के अध्यक्षा होत असतील तर होऊदे पहिल्यांदा अध्यक्ष होईल. ती माझी मैत्रीण आहे. मी पॅनेल उभा करेल म्हणून माझा उमेदवारी अर्ज भरू दिला गेला नाही...", असा आरोप विजय पाटकर यांनी केलाय.

पाहा व्हिडीओ : Meghraj Bhosale Mumbai:विजय पाटकर हा इंडस्ट्रीतला कलंक,अभिनयामध्ये कच्चा, मेघराज भोसलेंच प्रत्युत्तर

Uday Samant and Neelam Shirke: उदय सामंतांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला, मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीबाबत सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.