Ananya Pandey: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'चांद मेरा दिल' (Chand Mera Dil) या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिच्या अभिनयापेक्षा चित्रपटातील एका भरतनाट्यम नृत्यप्रसंगामुळे ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसत आहे. चित्रपटातील एक छोटी क्लिप सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल झाली असून, त्यावरून प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये अनन्या पारंपरिक भारतीय वेशभूषेत भरतनाट्यम आणि contemporary डान्सचा मिलाफ सादर करताना दिसत आहे. मात्र अनेक सोशल मीडिया नेटकऱ्यांनी तिचे डान्सची खिल्ली उडवली असून त्याचे मिम्स तयार केले आहेत. काहींनी तिच्या डान्सला 'रोबोटिक म्हटले आहे. तर काहींनी हा डान्स भरतनाट्यमसारख्या शास्त्रीय नृत्यप्रकाराचा अपमान असल्याचे म्हटले.
Ek Din Review: साई पल्लवी आणि जुनैद खान 'एक दिन' चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला? वाचा खास रिव्ह्यूअनन्या पांडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल
'चांद मेरा दिल' मधील तिचा भरतनाट्यम पाहून अनन्या पांडेला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, "मी १० वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय नृत्याचा अभ्यास केला आहे आणि हा डान्स खरोखरच अत्यंत खराब आहे. आणखी एकाने लिहिले हा भरतनाट्यमचा निव्वळ अपमान आहे."
Kangana Ranaut: कंगना रणौत यांनी खरंच गुपचूप लग्न केलं? स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करत सगळंच सांगितलंसाई पल्लवीशी तुलना
रेडिट (Reddit) वरील एका नेटकऱ्याने कमेंट केली, "ती कोणत्या डान्सचा प्रयत्न करत आहे हे मला माहित नाही, पण हे नक्कीच भरतनाट्यम नाही." दुसऱ्या एका नेटकऱ्याने तिची तुलना साई पल्लवीशी केली आणि लिहिले, "अनन्याचे डान्स पाहताना मला साई पल्लवीच्या अप्रतिम डान्सची आठवण झाली. यावरून हेच दिसून येते की, 'नेपो किड्स'ना (nepotism kids) सर्व काही किती सहजपणे मिळते." आणखी एकाने लिहिले, साई पल्लवीशी तुझी तुलना होऊच शकत नाही'
'चांद मेरा दिल' बद्दल
'चांद मेरा दिल' या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक सोनी यांनी केले आहे; यापूर्वी त्यांनी 'मीनाक्षी सुंदरेश्वर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट आरव आणि चांदनी यांच्या लव्हस्टोरी भोवती फिरते. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली करण जोहर, आदर पूनावाला, अपूर्व मेहता, सोमेन मिश्रा आणि मारिज्के डिसूझा यांनी केली आहे. 'चांद मेरा दिल' हा चित्रपट २२ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.