'राजा शिवाजी' मराठीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
'राजा शिवाजी' १ मे ला रिलीज झाला.
'राजा शिवाजी' हा रितेशच्या करिअरमधील मोठा चित्रपट ठरला.
रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट 'राजा शिवाजी'चा चौथा आठवडा सुरू आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे (महाराष्ट्र दिन) ला रिलीज झाला आहे. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत रितेश भाऊ झळकले आहेत. चित्रपटाने जगभरात १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाचे बॉक्स ऑफिसचे २४ दिवसांचे कलेक्शन जाणून घेऊयात.
View this post on Instagram
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, २४ व्या दिवशी 'राजा शिवाजी' चित्रपटाने ९५० शोजमधून ₹१.३० कोटींचे नेट कमाई केली आहे. आतापर्यंतचे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ₹१०८.७८ कोटींवर तर एकूण नेट कमाई ₹९२.०७ कोटींवर पोहोचली आहे.परदेशात या चित्रपटाने एकूण ₹४.२२ कोटींचे ग्रॉस कमाई मिळवून जगभरातील एकूण व्यवसाय ₹११३.०० कोटींवर पोहोचला आहे. लवकरच चित्रपट १०० कोटींचा टप्पा गाठणार असल्याचे दिसत आहे.
'राजा शिवाजी' ओटीटी अपडेट'राजा शिवाजी' चित्रपटाला आता १ महिना होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चित्रपटाच्या ओटीटीरिलीजची चर्चा पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट जिओ हॉटस्टारवर या ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे बोले जात आहे. जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळू शकतो असे बोले जात आहे. मात्र अद्याप ओटीटी प्लेटफॉर्म आणि ओटीटी रिलीज डेट याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.
View this post on Instagram
'राजा शिवाजी' चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला आहे. त्यामुळे चित्रपटात दोन्ही कलाकार झळकले आहेत. रितेश देशमुखसोबत चित्रपटात जिनिलिया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकली आहे. तसेच संजय दत्त, अभिषेक बच्चन, सचिन खेडेकर, विद्या बालन, फरदीन खान, भाग्यश्री, सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर हे कलाकार झळकले आहेत.
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चनला पाहून चाहता बेशुद्ध; 'जलसा' बाहेर उडाला गोंधळ, VIDEO व्हायरल