Amitabh Bachchan : अमिताभ बच्चनला पाहून चाहता बेशुद्ध; 'जलसा' बाहेर उडाला गोंधळ, VIDEO व्हायरल
Saam TV May 25, 2026 02:45 PM

अमिताभ बच्चन रविवारी चाहत्यांना भेटण्यासाठी 'जलसा' बंगल्याबाहेर आले.

अमिताभ बच्चन यांना पाहून एक चाहता बेशुद्ध पडला.

चाहता बेशुद्ध होऊन कोसळल्यामुळे बंगल्याबाहेर गोंधळ उडाला.

चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी कायमच उत्सुक असतात. अनेक कार्यक्रमांना किंवा वाढदिवसानिमित्त कलाकार आपल्या चाहत्यांना घराबाहेर येऊन भेटतात. मात्र महानायक अमिताभ बच्चन प्रत्येक रविवारी चाहत्यांना भेटतात. अमिताभ बच्चन यांना एक नजर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यामुळे बिग बींना पाहायला रविवारी 'जलसा' बंगल्या बाहेर गर्दी पाहायला मिळते.

काल (रविवारी) मात्र 'जलसा' बंगल्या बाहेर मोठा गोंधळ उडाला. अभिनेत्याला पाहण्यासाठी जमलेल्या प्रचंड गर्दीत एका चाहत्याला चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला, ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना २४ मे रोजी अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा'बाहेर घडली. प्रचंड गर्दीमुळे या जमावाला नियंत्रित करणे लवकरच कठीण झाले. दर आठवड्याला शेकडो चाहते अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाबाहेर जमतात. त्यांना हात दाखवण्यासाठी, फोटोकाढण्यासाठी आणि तो क्षण अनुभवण्यासाठी गर्दी करतात. काही चाहते केवळ बिग बींना एक झलक पाहण्यासाठी विविध शहरे आणि राज्यांतून प्रवास करून येतात.

व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे गर्दीच्या मध्यभागी एका चाहत्याला चक्कर येऊन तो खाली कोसळला, यामुळे परिस्थिती काहीशी चेंगराचेंगरीसारखी झाली आणि घटनास्थळी उपस्थित लोकांमध्ये एकच घबराट उडाली. अनेक चाहते त्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसले. त्यांनी त्याला पाणी दिले आणि त्याच्याभोवती थोडी मोकळी जागा करून देण्याचा प्रयत्न केला. संबंधित चाहत्याच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

View this post on Instagram