तुम्हाला जर क्राइम वेब सीरिज आवडत असतील, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच एक सीरिज प्रदर्शित झाली आहे. ही सीरिज सस्पेन्स आणि थ्रिलने परिपूर्ण आहे. ओटीटीवर येताच या सीरिजने टॉप ट्रेंडिंग यादीत स्थान मिळवलं आहे. एकूण आठ एपिसोड्सची ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे.
या सीरिजमध्ये मॅथ्यू लॉ, यलान नोएल, गॅब्रिएला डेनिस, सोफिना ब्राऊन आणि एरियाना ग्वेरा यांनी भूमिका साकारल्या आहेत. 14 मे 2026 रोजी ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. समिक्षकांकडून या सीरिजला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी प्रेक्षकांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच ही सीरिज ओटीटीवर ट्रेंड होत आहे.
कोर्टनी ए. केम्पच्या या क्राइम सीरिजचा प्रत्येक एपिसोड एक तासाचा असून असे एकूण आठ एपिसोड्स आहेत. जर तुम्ही एखाद्या दमदार क्राइम सीरिजच्या शोधात असाल, तर ही सीरिज तुमच्या वॉचलिस्टमध्ये आवर्जून समाविष्ट करण्यासारखी आहे.