आयपीएल 2026 चे प्लेऑफचे संघ आता निश्चित झाले आहेत, पण भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग तर वेगळ्याच मूडमध्ये दिसला. आयपीएलच्या तीन खेळाडूंवर युवराज चांगलाच भडकला असून संताप व्यक्त कतरत त्याने त्यांना चपलेने मारण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे त्याने सोशल मीडिया वर उघडपणे हे विधान केलं असून त्यांना आता तपलेने बडवण्याची वेळ आलीये, असं म्हटलंय. मात्र युवराज सिंगच्या या विधानामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.
युवराज सिंग ज्या तीन खेळाडूंबद्दल बोलत होता, ते तिघेही प्लेऑफमधून आधीच बाहेर पडलेल्या संघांमधील आहेत. त्यापैकी एक त्याचा शिष्य आहे, तर इतर दोघांनी त्याच्याकडून प्रशिक्षण घेतलें नसलं तरीही त्यांचा पंजाबच्या संघाशी नक्कीच संबंध आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, युवराज सिंगने प्रियांश आर्य, अर्शदीप सिंग आणि हरप्रीत ब्रार यांना चपलेने हाणण्याचं विधान केलंय.
पंजाब किंग्स प्लेऑफमधून बाहेर
प्रियांश आर्य, अर्शदीप सिंग आणि हरप्रीत ब्रार… हे तिन्ही खेळाडू आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्स संघाचा भाग होते. मात्र हा संघ पुन्हा एकदा ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. पंजाब किंग्स हा आयपीएलमधील एकमेव संघ आहे जो आत्तापर्यंत प्लेऑफमध्ये जागा मिळवलेली नाही.

हरप्रीत ब्रारच्या फोटोवर युवराजची कमेंट चर्चेत
मात्र या तिघांना चपलेने मारण्याचं विधान युवरजाने केलं कधी ? असाच प्रश्न सर्वांच्या मनात आहे. जेव्हा हरप्रीत ब्रारने, प्रियांश आर्य आणि अर्शदीप सिंग यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. हरप्रीतने प्रियांशला ‘स्लॉगर’ आणि अर्शदीपला ‘ब्लॉगर’ म्हटलं होतं. त्याच फोटोवर युवराज सिंगने कमेंट केली. “आता तुम्हा सर्वांना तुमच्या चपलांनी मारण्याची वेळ आली आहे,” असं त्याने या कमेंटमध्ये लिहीलं होतं. त्याने मजेत लिहीलं असलं तरीही ही कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
A post shared by Harpreet Brar (@harpreetsbrar95)
IPL 2026 मध्ये तिघांचा परफॉर्मन्स
या खेळाडूंचा संघ आयपीएल 2026 च्या प्लेऑफमध्ये तर पोहोचू शकला नाही. पण त्यांची कामगिरी पाहिल्यास ती काहीशी समाधानकारक वाटते. प्रियांश आर्याने आयपीएल 2026 च्या 13 सामन्यांमध्ये 211 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 364 धावा केल्या आहेत. अर्शदीप सिंगने 14 सामन्यांमध्ये 38.64 च्या सरासरीने आणि10.20 च्या इकॉनॉमीने 541 धावा देत केवळ 14 बळी टिपले. दुसरीकडे, हरप्रीत ब्रारने दोन सामन्यांमध्ये खेळून 2 विकेट्स घेतल्या.