IPL 2026: एलिमिनेटर सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सची धाकधूक वाढली, सामना न खेळता होणार आऊट! काय आहे नियम
GH News May 26, 2026 07:12 PM

IPL 2026 Eliminator SRH vs RR: आयपीएल 2026 स्पर्धेचा विजेता ठरण्यासाठी आता फक्त चार सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. क्वॉलिफायर 1, एलिमिनेटर, क्वॉलिफायर 2 आणि अंतिम सामना असे चार सामने आहेत. क्वॉलिफायर 1 सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. या सामन्यातील पराभूत संघाला अंतिम फेरीसाठी आणखी एक संधी मिळेल. पण एलिमिनेटर फेरीत तसं नाही. कारण या सामन्यात पराभूत झालेल्या संघाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार आहे. हा सामना 27 मे रोजी मुल्लानपुरच्या महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे. पण या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सला टेन्शन आलं आहे. त्याला कारणंही तसंच आहे. आयपीएलच्या एका नियमामुळे राजस्थान रॉयल्सचं टेन्शन वाढलं आहे.

एलिमिनेटर सामना काही कारणास्तव रद्द झाला तर..

आयपीएल 2026 स्पर्धेत साखळी फेरीचा थरार संपला आहे. या फेरीत एकच सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे पंजाब किंग्सचं खऱ्या अर्थाने नुकसान झालं आणि 16 गुणांचं गणित सुटलं नाही. पण एलिमिनेटर सामना पावसामुळे रद्द झाला तर एक गुण देता येणार नाही. उलट राजस्थान रॉयल्सचं नुकसान होईल. कारण हा सामना न खेळताच राजस्थान रॉयल्सला स्पर्धेतून आऊट व्हावं लागेल. कारण प्लेऑफच्या एकाही सामन्यासाठी राखीव दिवस नाही. त्यामुळे या सामन्याचा निकाल गुणतालिकेच्या आधारावर काढला जाईल. गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्स संघ चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे क्वॉलिफायर 2 चं तिकीट सनरायझर्स हैदराबादला मिळेल.

सामन्याचा निकाल त्या दिवशी कसा लागणार?

एलिमिनेटर सामना असो की आणखी कोणता सामना, निकालासाठी कमीत कमी 5-5 षटकांचा सामना होणं आवश्यक आहे. जर दोन्ही संघांनी किमान पाच सामन्यांचा खेळ खेळला असेल तर पंच डकवर्थ लुईस नियमानुसार विजेत्याचा निर्णय घेतील. पण पाच षटकांपेक्षा कमी षटकांचा खेळ झाला असेल तर सामना रद्द करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अशा स्थितीत सनरायझर्स हैदराबादचा फायदा होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.