प्रसिद्ध दिग्दर्शकानं घराच्या छतावरून उडी मारून जीवन संपवलं; पोलिसांना सापडली सुसाईड नोट
Saam TV May 27, 2026 09:45 PM
  • बंगाली दिग्दर्शक अनिकेत दत्ता यांचा कोलकात्यात मृत्यू.

  • घराच्या छतावरून पडल्याने गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान निधन.

  • घटनास्थळी सुसाईड नोट सापडल्याने आत्महत्येचा संशय.

बंगाली चित्रपटसृष्टीतीलएक प्रसिद्ध दिग्दर्शक व चित्रपट निर्माते अनिकेत दत्ता यांचे बुधवारी २७ मे रोजी कोलकाता येथील गरियाहाट परिसरात निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या छतावरून खाली पडून ते गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर लगेचच त्यांना ढाकुरिया येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती गंभीर होती.

Shocking : "मुलगा होत नाही...." विवाहित महिलेची सासरच्या मंडळींकडून हत्या; पतीसह ५ कुटुंबीयांविरोधात गुन्हा

उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनाघटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाली आहे, ती तपासणीसाठी हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची आत्महत्या म्हणून चौकशी केली जात आहे. सूत्रांनुसार ही घटना गरियाहाट येथील त्यांच्या पत्नीच्या निवासस्थानी घडली. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद देत परिसर सील केला आहे.

सलमान कोपऱ्यात बसून रडत असेल! 'चुनरी चुनरी' गाण्याच्या रिमेकवरून वरुण धवन ट्रोल

ही घटना अपघात होता की यामागे काही कट किंवा इतर हेतू होता,याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता यांची मुलगी सध्या परदेशात राहते. ती कोलकात्यात आल्यानंतरच चित्रपट निर्मात्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला जाणार आहे.

बंगाली सिनेमातून निर्माण केली आपली ओळख

अनीक दत्ता यांनी बंगाली सिनेमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांची अनोखी आणि बेधडक शैलीमुळे ते ओळखले जात होते. त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यांचा पहिला प्रोजेक्ट हा भूतेर भबिश्यत होता. ही एक व्यंग्यात्मक ड्रामा चित्रपट होता. यात राजकारण, समाज आणि कोलकाताची बदलती शहरी संस्कृतीचं वर्णन एका वेगळ्या अनोख्या शैली केलं होतं.

हा चित्रपट कल्ट म्हटलं जातं. ते त्याच्या चित्रपटांमधील विनोद, मार्मिक उपहास आणि सामाजिक भाष्य यांच्या कुशल मिश्रणासाठी प्रसिद्ध होते. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राजकारण, अर्थशास्त्र आणि समकालीन वास्तव यांसारख्या विषयांना अत्यंत सखोलतेने हाताळले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.