Video: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
जयदीप मेढे May 27, 2026 11:43 PM

Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार-षटकारांचा धुमाकूळ घातलेल्या राजस्थानच्या वैभव सुर्यवंशीने आज एलिमीटर सामन्यामध्ये सुद्धा हैदराबादची धुळदाण करत अवघ्या 29 चेंडूमध्ये 97 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत वैभवने 12 षटकार आणि 5 चौकारांची आतषबाजी केली. त्याच्या या खेळीमुळे राजस्थानने धमाकेदार सुरुवात केली. वैभवला जगातील सर्वात वेगवान शतक विक्रम मोडण्याचा मान मात्र मिळवता आला नाही. ख्रिस गेलच्या नावावर अवघ्या 30 चेंडूत शतक झळकावण्याचा पराक्रम आहे. वैभव 29 चेंडूत 97 धावा करून बाद झाला. बाद झाल्यानंतर त्याने बराच वेळ मैदान सोडले नाही. त्याचा कंठ दाटून आला होता. राजस्थानच्या डगआऊटमध्ये सुद्धा सन्नाटा पसरला होता. 

हैदराबादने नाणेफेक जिंकून मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियमवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वैभव सूर्यवंशी 29 चेंडूंमध्ये 97 धावांवर बाद झाला. त्याने एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा ख्रिस गेलचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. गेलने 2012 मध्ये 59 षटकार मारले होते. सूर्यवंशीने या हंगामात 65 षटकार मारले आहेत. पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर होईल. विजयी संघ 29 मे रोजी क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध खेळेल.

राजस्थानने पॉवरप्लेमध्ये 80 धावा केल्या

राजस्थान रॉयल्सने पॉवरप्लेमध्ये एकही गडी न गमावता 80 धावा केल्या. पॅट कमिन्सने सुरुवातीला 9 धावांचे षटक टाकले, पण त्यानंतर वैभव सूर्यवंशीने गोलंदाजांवर हल्ला चढवला. सूर्यवंशीने कमिन्सच्या एका षटकात 25 धावा केल्या आणि त्यानंतर अवघ्या 16 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. शकिब हुसेनच्या स्लोअर डिलिव्हरीवर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक मोठा षटकार मारून त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो षटकार स्टेडियमच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन पडला.

कमिन्सच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार

वैभव सूर्यवंशीने कमिन्सच्या तिसऱ्या षटकात एक चौकार आणि सलग तीन षटकारांसह 25 धावा केल्या. सूर्यवंशीने अवघ्या 10  चेंडूंमध्ये 36 धावा पूर्ण करत, आयपीएलच्या एका हंगामात 600 धावा करणारा सर्वात तरुण फलंदाज बनण्याचा मान मिळवला.  

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.