इन्स्टाग्रामवरच्या मैत्रिणीला नग्नावस्थेतील फोटो पाठवणे पडले महागात, तरुणाने डॉक्टरकडून उकळली खंडणी
Marathi May 28, 2026 06:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सोशल मीडियावरील एक छोटीशी चूक किती महाग पडू शकते याचा प्रत्यय राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथील एका नामांकित डॉक्टरला आला. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका महिलेला स्वत:चे नग्नावस्थेतील फोटो शेअर करणे या डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे. पीडित डॉक्टरला ब्लॅकमेल करून लाखो रुपयांची मागणी करणाऱ्या लांज्यातील एका भामट्याविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​वडदहसोळ येथील ३१ वर्षीय पीडित डॉक्टरची २०२५ मध्ये इन्स्टाग्रामवर ‘neha_biradi_03’ नावाच्या एका महिला आयडी धारकाशी ओळख झाली होती. या कथित महिलेच्या जाळ्यात अडकून डॉक्टरने आपले काही नग्न अवस्थेतील फोटो तिच्यासोबत शेअर केले. हेच फोटो हत्यार म्हणून वापरत सिद्धेश जयवंत आंबरे (वय ३०, रा. साडवली, लांजा) या आरोपीने डॉक्टरला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपीने डॉक्टरच्याच मोबाईलवर त्यांचे ते नग्न फोटो पाठवून, “हे फोटो सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणी व्हायरल करेन,” अशी थेट धमकी दिली.
च्या
​बदनामीच्या भीतीने डॉक्टरकडून सिद्धेशने तब्बल २,२५,०००/- रुपयांची खंडणी मागितली. इज्जत वाचवण्यासाठी घाबरलेल्या डॉक्टरने तातडीने २५,००० रुपये गुगल पे (Google Pay) द्वारे आरोपीच्या खात्यावर ट्रान्सफरही केले. मात्र, आरोपीची पैशांची हाव संपत नसल्याने अखेर डॉक्टरने हिंमत दाखवून पोलिसांत धाव घेतली. ​या प्रकरणी राजापूर पोलिसांनी संशयित आरोपी सिद्धेश जयवंत आंबरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. आपले खाजगी फोटो, व्हिडिओ कोणाशीही शेअर करू नका. ‘हनी ट्रॅप’ आणि सायबर ब्लॅकमेलिंगचे रॅकेट सक्रिय आहे, सावध राहा असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.