मंगळवेढ्याच्या रिलस्टारनं आयुष्य संपवलं, रोहिणीच्या शेवटच्या इन्स्टा रिलमध्ये नेमकं काय?
Marathi May 28, 2026 07:25 PM

Reel Star Rohini Paradhye Last Reel: सोलापूर (Solapur News) जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात (Mangalwedha Taluka) घडलेल्या धक्कादायक घटनेनं अख्खा महाराष्ट्र (Maharashtra News) हादरलाय. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या 25 वर्षांच्या विवाहित रिल स्टारनं आपलं आयुष्य संपवलं. मंगळवेढा तालुक्यात आपल्या पतीसोबत ‘हॉटेल ग्रामपंचायत’ चालवणारी रोहिणी निलेश पाराध्ये (Rohini Paradhye) सोशल मीडियावर रिल्स करायची. अनेकदा तिच्या हॉटेलच्या स्वयंपाकघरातून लोकांना खळखळून हसवणारे रिल्स ती शेअर करायची. पण, त्याच स्वयंपाक घरात पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेत आत्महत्या केली. नेहमी हसत-खेळत रिल्स शेअर करणाऱ्या रोहिणीनं असं टोकाचं पाऊल का उचललं? हाच प्रश्न सध्या चर्चेत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तणावामुळे झालेल्या वादातून रोहिणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहेत. रोहिणीच्या आत्महत्येनंतर आता तिचं शेवटचं रिल जोरदार व्हायरल होत आहे.

रोहिणीचं शेवटचं रिल (Reel Star Rohini Paradhye Last Reel Video)

रोहिणी पाराध्ये तिच्या शेवटच्या रिलमध्ये आपल्या ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या किचनमध्ये भाकऱ्या थापताना दिसतेय. दुर्दैवी बाब म्हणजे, रोहिणी पाराध्ये हिनं याच किचनमध्ये पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. हा रिल रोहिणीनं तिच्या नवऱ्यासोबत केलाय, हा रिल तिनं भाकऱ्या थापतानाच केला आहे.

रोहिणी काहीशी वैतागून म्हणतेय की, अहो तुम्हाला काही कळतंय बिळतंय की नाही? दिवसभर माझ्या हाताला दम नाही, सकाळपासून भाकऱ्या बनवतेय… तुमचं काय आपलं काउन्टरवर बसता… जरा मदत करायला काय होतंय तुम्हाला?”

यावर तिचा नवरा म्हणतो की, “आता भाकरी करताना तुला कसली मदत करायची गं? भाकरी करताना तुला माझीच मदत पाहिजे, मी तुला पीठ मळून द्यायला चालू करतो, थापून देतो… तू भाकऱ्या भाज… एवढंच राहिलंय आत…”

नवऱ्याला वैतागलेलं पाहून रोहिणी म्हणते की, “फुगलेली भाकर कर, चांगली भाकर कर कसं म्हणायला येतं तेवढं… मला मदत करायला नको वाटतं… आयती भाकर खायला कशी गोड लागतेय…”

यावर निलेश पाराध्ये म्हणतो की, “अरे अरे अरे… काय ही अवस्था तुझी? पूर्वीच्या बायका पायलीच्या भाकरी बनवायच्या एका टायमाला बसून… तू दोन भाकरी बनवते, त्यातली अर्धीच मी खातो… आणि त्यालाही तू वैतागली… काय रे लेका… अवघड आहे… “

रोहिणी म्हणते की, “बघावं तेव्हा कसं पूर्वीचं काढता ओ तुम्ही… आताचं बोला की, बायकोला ठेच लागली, तर नवऱ्याच्या डोळ्यांत पाणी यावं… बायको काम करायला लागली, तर नवऱ्याला कीव यावी…”

“अगं अनू माझ्या जळी स्थळी काष्टी पाषाणी… फक्त आणि फक्त तुझाच विचार असतो डोक्यात… आणि तू म्हणतेय माझी येऊ द्या कीव… वेळ पडली तर तुझ्यासाठी जीव सोडलं जीव… एवढं माझं प्रेम आहे…”, असं तिचा नवरा म्हणतो.

रोहिणी आणि निलेशचा हा रिल नवरा-बायकोमधलं लाडीक भांडणावर केला आहे. त्यावेळी निलेश पाराध्येनं विचारंही केला नसेल की, जिच्यासोबत साता जन्माची स्वप्न पाहिली, ती अचानक अशी साथ सोडून जाईल.

रोहिणी पारामध्ये हिच्या आत्महत्येचं कारण काय? ()

मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथल्या प्रसिद्ध रील स्टार असलेल्या रोहिणी पारामध्ये हिनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आता पोलीस रोहिणीच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेऊ लागले आहेत. रोहिणी पाराध्ये आणि तिचा नवरा निलेश पाराध्ये यांनी ‘हॉटेल ग्रामपंचायत’ सुरू केलेलं. बघता-बघता दोघांचा व्यवसाय जोमात सुरू झाला आणि दोघांचा संसार हसत-खेळत सुरू होता. पण, तेवढ्यात नियतीनं डाव टाकला आणि रोहिणीनं टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथे फेमस रील स्टार रोहिणी पाराध्ये हिनं गळफास घेऊन आत्महत्या प्रकरणी आता पोलीस मृत्यूच्या कारणाचा शोध घेऊ लागले आहे.  ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावानं व्यवसाय करत असणाऱ्या आपल्याच हॉटेलात रोहिणीनं टोकाचं पाऊल उचललं. हॉटेल व्यवसायाच्या शाखा वाढल्या आणि यातून आलेल्या तणावामुळे आणि झालेल्या वादामुळे रोहिणीनं रागात आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं

पाहा व्हिडीओ : Mangalwedha News : सोलापूरची रिल स्टार असणाऱ्या विवाहितेची आत्महत्या

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.