Veen Doghatli hi Tutena: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. स्वानंदी आणि समर यांच्या नात्यातील भावनिक चढ-उतारांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही मालिका आता एका मोठ्या ट्विस्टमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. मालिकेत सुरू असलेल्या अंशुमनच्या लग्नसोहळ्यात एक धक्कादायक सत्य समोर येणार असून, त्याचा परिणाम थेट लग्नावर होणार आहे.
मालिकेच्या सुरुवातीपासूनच स्वानंदीला अंशुमनच्या वागण्याबद्दल संशय होता. अंशुमनच्या लग्नाबाबतही ती फारशी उत्सुक नव्हती. मात्र समरच्या आग्रहाखातर तिने या लग्नात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, राजवाडे कुटुंबाच्या घरात काम करणारी चिंगी सर्वांची मर्जी जिंकताना दिसत होती. पण अंशुमनचं तिच्यावरील आकर्षण स्वानंदीच्या नजरेतून सुटलेलं नव्हतं. आता मालिकेच्या आगामी भागात स्वानंदीच्या हातात चिंगीचे प्रेग्नन्सी रिपोर्ट्स लागणार आहेत. हे रिपोर्ट्स पाहून ती हादरून जाते. चिंगी गरोदर असल्याचं समजताच स्वानंदी तिला याबद्दल प्रश्न विचारते. त्यावेळी कळते चिंगीच्या पोटातील बाळ अंशुमनचं आहे.
Crime News: ४० कोटींचा जमीन व्यवहार; वादानंतर महिला वकिलाची आत्महत्या, ज्येष्ठ वकील आणि मुलाविरोधात गुन्हा दाखलझी मराठीने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये हा संपूर्ण प्रसंग दाखवण्यात आला आहे. सत्य समजताच स्वानंदी थेट चिंगीला घेऊन लग्नाच्या मंडपात पोहोचते. लग्नाची तयारी सुरू असतानाच ती सर्वांसमोर उभी राहून, “थांबा! हे लग्न होऊ शकत नाही,” असे ठामपणे सांगते. यानंतर ती अंशुमनच्या कृत्याचा पर्दाफाश करत कुटुंबीयांना सत्य सांगते.
Jacqueline Fernandez: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ; २०० कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चितView this post on InstagramA post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
या प्रोमोने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगवली आहे. अनेक प्रेक्षकांनी स्वानंदीच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. एकाने कमेंट केली “स्वानंदी रॉक्स”, दुसऱ्याने कमेंट केली, “आता खरी मजा येणार”, आणखी एक म्हणाला, “अंशुमन-चिंगीचं लग्न होणार का?” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.