फरहान अख्तर याच्या ‘डॉन 3’ चित्रपटातून शूटिंगच्या अवघ्या काही दिवस आधी माघार घेतल्याने अभिनेता रणवीर सिंह मोठ्या वादात सापडला. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने रणवीर सिंह याच्यावर थेट बंदी घातली. रणवीर सिंह याच्यावर बंदी घातल्याने एकच खळबळ उडाली. अनेकांनी थेट फरहान अख्तरला टार्गेट केले. आता रणवीर सिंह बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रकरणात काही अभिनेते रणवीर सिंहची बाजू घेतानाही दिसले. मात्र, रणवीरने या वादावर भाष्य करणे टाळेल. डॉन 3 चित्रपटाचा वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. असे सांगितले जातंय की, रणवीर सिंह याने या डॉन 3 च्या विषयात सर्व काही ठीक करण्याकरिता प्रयत्न केला. मात्र, त्याच्या या ऑफरला नकार देण्यात आला.
हेच नाही तर रणवीर सिंहने जोया अख्यरला ऑफरही दिली. मात्र, त्याचा काहीच फायदा होऊ शकला नाही. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, नुकताच रणवीर सिंह याने फरहान अख्तरला अप्रोच करत एक चांगली ऑफर दिला. रणवीर सिंह याने हा वाद थांबवण्याकरिता फरहान अख्तरला दुसऱ्या चित्रपटात काम करण्याबाबत ऑफर दिली. यासोबतच त्याने जोया अख्तरला पण एक ऑफर दिली.
हे देखील सांगण्यात आले की, ऑफर फरहान अख्तर आणि प्रॉडक्शन पार्टनर रितेश सिधवाणीला दिली होती. मात्र, रणवीर सिंहची ऑफर नाकारली आहे.फक्त फरहान अख्तरच नाही तर रणवीर सिंह याच्यासोबत काम करण्यास जोयाने देखील नकार दिला. रणवीर सिंह हा डॉन 3 मध्ये दिसणार होता. तशी घोषणाही करण्यात आली पण अभिनेत्याने चित्रपट करण्यास नकार दिला आणि तेव्हापासूनच हा वाद वाढण्यास सुरूवात झाली.
त्यांचे म्हणणे आहे की, रणवीर सिंह याच्या या निर्णयाने त्यांचे 45 कोटींचे नुकसान झाले. अभिनेत्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचेही त्यांनी संकेत दिले. याच प्रकरणात रणवीर सिंह याच्यावर बॅन करण्यात आले. काही कलाकारांनी रणवीरला सपोर्ट करण्यासही सुरूवात केली. अजून हा वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीये.