Yavatmal Crime News : यवतमाळच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे समन्वयक नितिन भुतडा यांची केंद्र सरकारच्या महामंडळावर नियुक्ती करण्यासाठी 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसात तिघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे (Yavatmal Crime News) दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र केंद्रात राज्यमंत्री दर्जाचे पद मिळून देण्यासाठी आर्थिक फसवणूक (Crime News) करणारी टोळी प्रकरणाने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
Yavatmal Crime : स्पाय वायफाय, मेटल क्लॉक बसवून आरोपींची रेकॉर्डिंग, तिघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची पन्नास हजार रुपयांनी फसवणूक केली होती. केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी पैकी टोकन रक्कम म्हणून एक कोटी रुपये मागितले होते. भाजपचे माजी मंत्री मदन येरावार यांच्या कार्यालयात स्पाय वायफाय, मेटल क्लॉक बसवून भुतडा यांनी फसवणूक करणाऱ्या आरोपींची रेकॉर्डिंग केली. या प्रकरणी लौकिक फुलकर, गणेश राठोड आणि विश्वजीत राठोड, हि आरोपींची नावे असून सर्व यवतमाळ येथील रहिवाशी आहे.