आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोभिता तिच्या खासगी आयुष्यावरून होणाऱ्या चर्चांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. ‘गॅलाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत सोभिता म्हणाली, “या सर्व गोष्टींनी मला खूप काही शिकवलं आहे. होय, लोकांचं लक्ष अर्थातच होतं, पण मला असं वाटतं की ते फक्त उत्सुक होते. मी माझं आयुष्य जगत होते आणि मला खरंच माहीत नव्हतं की लोक माझ्याकडून कशा पद्धतीच्या प्रतिक्रियेची अपेक्षा करत होते.”
“आज मी माझ्या आयुष्यातील सर्वांत चांगला काळ जगतेय. वेळेनुसार मला स्वत:वर अधिक विश्वास निर्माण होत गेला आहे. आता मी स्वत:बद्दल अधिक स्पष्ट आहे आणि वेगवेगळ्या मतांमध्ये, टीकांमध्येही मी स्वत:ला प्रभावित न करता राहू शकते. सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीविषयी खूप बोललं जातं, खूप गोंधळ असतो. पण हे एखाद्या ऋतूसारखं असतं. ऋतू बदलला की तसाच समाजातील वातावरण बदलतं”, असं मत सोभिताने मांडलं.
याविषयी ती पुढे म्हणाली, “या गोष्टींकडे फार गांभीर्याने पहायची गरज नाही. कारण हे कायम असंच राहत नाही. ऋतू बदलतात. माणसाने आतून मजबूत आणि संतुलित राहणं गरजेचं आहे.” नाग चैतन्य आणि सोभिताचं नाव सर्वांत आधी 2022 मध्ये एकमेकांशी जोडलं गेलं होतं. त्याच्या एक वर्ष आधीच नाग चैतन्य आणि समंथाचा घटस्फोट झाला होता.
नाग चैतन्यने नुकतीच दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. समंथाचं करिअर उद्ध्वस्त केलं, तिची फसवणूक केली अशा खोट्या बातम्या किंवा चर्चा पसरवणाऱ्यांविरोधात त्याने याचिका दाखल केली होती. कोर्टानेही त्याला मोठा दिलासा देत अशा खोट्या बातम्या देणाऱ्यांना नोटीस बजावली आहे.