Actress Bath Video Leak: तारक मेहता फेम अभिनेत्री नेहल वडोलियाने अलीकडेच केलेल्या एका धक्कादायक खुलाशामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. एका लोकप्रिय टीव्ही शोमध्ये असताना तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली. टॉयलेटमध्ये सिक्रेट कॅमेरा लावण्यात आला होता आणि तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक झाल्याचा दावा स्वत: अभिनेत्रीने केला आहे.
सुनो इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नेहलने आपल्या आयुष्यातील हा भयावह प्रसंग सांगितला. तिने सांगितले की, हाउस अरेस्ट शोच्या शूटिंगदरम्यान स्पर्धकांसाठी असलेल्या टॉयलेटमध्ये सिक्रेट कॅमेरा बसवण्यात आला होता. सुरुवातीला या गोष्टीची कोणालाही कल्पना नव्हती. मात्र काही काळानंतर तिच्या अंघोळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि इतर माध्यमांतून पसरल्याची माहिती तिला मिळाली.
Famous Artist Death: प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशीहा प्रकार समजताच अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आणि पाच दिवसांमध्येच तिने शो सोडला. एका कलाकारासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होणे किती वेदनादायी असते, याबद्दल तिने मत मांडले. या घटनेनंतर तिला अनेक मानसिक आणि भावनिक आव्हानांचा सामना करावा लागल्याचेही तिने सांगितले. नेहलच्या मते, या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागला. सोशल मीडियावर व्हिडिओबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर तिला अनेक चुकिच्या कमेंट्स आणि प्रश्नांचा सामना करावा लागला.
Naga Chaitanya: नागा चैतन्यने समंथाचं करियर खराब केलं; अभिनेत्यावर गंभीर आरोप, प्रकरण थेट हायकोर्टात पोहोचलंView this post on Instagram
टीव्ही आणि मनोरंजन क्षेत्रात कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा अनेकदा चर्चेत येत असतो. नेहलने केलेल्या या खुलाशामुळे पुन्हा एकदा शूटिंगच्या ठिकाणी होणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, नेहल वडोलियाच्या या खुलाशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, अनेक चाहत्यांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे.