भारताचाच दबदबा, चीनचे वर्चस्व नाहीच… अखेर अमेरिका झुकलीच, थेट..
Tv9 Marathi May 31, 2026 06:45 PM

मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेचे संबंध ठीक आहेत. भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला, त्यानंतर संबंध तणावात आली. पुन्हा अमेरिकेने भारताच्या पायाला लोटांगण घालण्यास सुरूवात केली. डोनाल्ड ट्रम्प 10 वेळा जागतिक मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत, सांगताना दिसतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा भारत महान देश असल्याचेही म्हटले. मात्र, दुसरीकडे कधी भारताला नर्काचा दरवाजा म्हणायचे तर कधी कपडे धुण्याचे मशिन भारत असल्याचे बोलायचे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारताच्या पुन्हा एकदा जवळ येण्याचा प्रयत्न अमेरिकेने करण्यास सुरूवात केली. अमेरिकेचे रक्षा सचिव पीट हेगसेथ यांनी पुन्हा एकदा भारताचे तोंड भरून काैतुक केले. हेच नाही तर त्यांनी भारताला आशियातील महत्वाचा भागीदारी म्हटले.

सिंगापुर येथील शांगरी ला डायलॉगमध्ये ते भारताबद्दल बोलताना दिसले. पीट हेगसेथ यांनी म्हटले की, कोणताही देश.. मग तो चीन का असे ना तो आशियामध्ये मनमानी करू शकत नाही, त्यांची मनमानी सहन केले जाणार नाही. भारताची वाढती सैन्य ताकदवर बोलताना त्यांनी म्हटले की, भारतीय सशस्त्र दल आधुनिकीकरण करत आहे. विशेष म्हणजे हिंद महासागरात संतुलन बनून ठेवण्याकरिता मदत करत आहेत.

भारताचे उच्चस्तरीय सैन्य अभियान विशाल आैद्येगिक क्षमता निर्माण करण्याकरिता प्रयत्न करत आहे. भारताचे थेट काैतुक करत चीनला अमेरिकेले फाट्यावर मारल्याचे बघायला मिळत आहे. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, भारताच्या कोणत्याही अडचणीच्या काळात आम्ही त्यांची साथ देण्यास तयार आहोत. त्यांनी कोणत्याही अडचणीत आम्हाला डोळे झाकून आठवावे, आम्ही त्यांच्या मदतीला जाऊ.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेने जे काही रूप दाखवली आहेत, त्यानंतर भारत अमेरिकेवर किती विश्वास ठेवेल, हे सांगणे कठीणच आहे. कारण अमेरिकेची प्रत्येक दिवसाला भूमिका बदलते. अमेरिकेवर विश्वास ठेवणे कठीण आहे. पाकिस्तानला अमेरिकेने हाताला धरले. पाकिस्तानचे पतंप्रधान सतत अमेरिकेच्या दाैऱ्यावर असतात. त्यामुळेही भारत अमेरिकेपासून सावध भूमिकेत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.