ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ, बिकट अवस्था पाहून चाहत्यांनाही प्रश्न
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क May 31, 2026 06:43 PM

Mitali Sharma Viral Photo on Mumbai Streets: सिनेसृष्टीतील झगमगाट (Bollywood) पाहून लोकांना अनेकदा असं वाटतं की, या इंडस्ट्रीत येणाऱ्या प्रत्येकाला प्रसिद्धी आणि यश मिळते. परंतु, पडद्यामागे अशा अनेक कहाण्या दडलेल्या असतात, ज्या कुणालाही हादरवून टाकू शकतात.  अशीच एक कहाणी अभिनेत्री मिताली शर्मा (Mitali Sharma) या अभिनेत्रीची. जिला एकेकाळी  इंडस्ट्रीतील रायझिंग स्टारपैकी (Entertainment) एक मानले जात होते. परंतु, वेळ कुणाचीच सारखी नसते. फिल्म आणि मॉडेलिंगमध्ये नशीब आजमवणाऱ्या अभिनेत्रीवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली. तिचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

काम न मिळाल्यानं मिताली शर्माची अवस्था बिकट झाली (Mitali Sharmas Heartbreaking Journey)

ममिताली शर्मा. मुळची दिल्लीतील रहिवासी. या अभिनेत्रीने आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात भोजपुरी सिनेमा आणि मॉडेलिंगमधून केली होती. सुरुवातीला तिला ओळख मिळाली. तिनं नाव कमावलं.  फिल्ममेकर्स तिला उत्तम अभिनेत्रीच्या स्वरुपात पाहू लागले. पण हळूहळू गोष्टी बदलू लागल्या. तिला काम मिळणे हळूहळू कमी झाले.  फिल्म इंडस्ट्रीत  टिकून राहणं तिच्याकडे कठीण होत गेलं. काम न मिळाल्यामुळे तिची आर्थिक स्थिती बिकट होत गेली. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  मिताली शर्मा मोठी स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आली होती. मुंबईत आल्यानंतर ती आपल्या कुटुंबापासून दुरावली होती. दरम्यान, स्वप्नांच्या शहरात तिचा संघर्ष वाढत गेला. तिला भक्कम पाठिंब्याची गरज होती. आर्थिक अडचणी,  सततचा नकार याचा थेट परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावर होऊ लागला.  मुंबईच्या लोखंडवाला परिसरात मिताली अत्यंत दयनीय अवस्थेत रस्त्यावर दिसली, तेव्हा अनेकांना धक्का बसला.   माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर अभिनेत्रीनं सर्वात आधी जेवण मागितले होते.  सध्या अधिकाऱ्यांनी  तिला वैद्यकीय मदत पुरवली आहे.  नंतर तिला उपचारासाठी मानसिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिची अशी दयनीय अवस्था पाहून अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली?  असे अनेक प्रश्न नेटकरी तसेच तिच्या चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रोहिणी पाराध्येपूर्वीही महाराष्ट्राने गमावले अनेक रिलस्टार्स; कुणाचा अपघात, तर कुणाचा...

'एन्ट्री आधीच माझ्या पायजम्याची नाडी तुटली अन्..'; शोमध्ये अशोक सराफांनी सांगितला मजेदार किस्सा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.