सात्त्विक-चिरागला ऐतिहासिक जेतेपद, सिंगापूर ओपन जिंकणारी पहिली हिंदुस्थानी पुरुष जोडी
Marathi June 01, 2026 07:24 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या हिंदुस्थानच्या स्टार पुरुष दुहेरी जोडीने दोन वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवून सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रविवारी अंतिम सामन्यात त्यांनी इंडोनेशियाच्या फजार अल्फियान आणि मुहम्मद फिक्री यांचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव करत इतिहास रचला. सिंगापूर ओपन जिंकणारी ही पहिलीच हिंदुस्थानी पुरुष दुहेरी जोडी ठरली, हे विशेष.

पहिला गेम गमावल्यानंतर दमदार पुनरागमन

अत्यंत चुरशीच्या आणि दर्जेदार झालेल्या अंतिम लढतीत सात्त्विक-चिराग यांनी पहिला गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले. 1 तास 13 मिनिटे चाललेल्या या सामन्यात त्यांनी दबावाखाली संयम राखत विजेतेपदावर नाव कोरले. यासह त्यांच्या कारकीर्दीतील नववे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद आणि तिसरे सुपर 750 विजेतेपदही नोंदवले गेले. हे त्यांच्या कारकीर्दीतील नववे बीडब्ल्यूएफ (बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन) वर्ल्ड टूर विजेतेपद ठरले.

दोन वर्षांनंतर विजेतेपदाचा आनंद

सात्त्विक आणि चिराग जोडीने यापूर्वी 2024 च्या थायलंड ओपन स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्यांना सलग चार वेळा अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सिंगापूरमधील हे यश त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचे ठरले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.