आशा भोसलेंनंतर आणखी एक दैवी सूर हरपला; दिग्गज गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, ऐका त्यांची 10 अजरामर गाणी
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 01, 2026 12:43 PM

Suman Kalyanpur passes away at the age of 89: आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाच्या काही आठवड्यातच भारतीय संगीत क्षेत्राला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आपल्या सुमधुर आवाजाने पिढ्यानुपिढ्या मंत्रमुग्ध करणाऱ्या महान गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांचे रविवारी, 31 मे 2026 रोजी निधन झाले. लोखंडवाला (Entertainment) संकूल येथील राहत्या घरात त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.  वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.   'शुक्रची चांदनी' आणि 'मंगू' यांसारख्या सिनेमात गाणी गाऊन त्यांनी आपल्या कारकि‍र्दीला सुरुवात केली होती. त्यांनी हिंदीसह मराठीतीलही अनेक गाणी गायली.  

ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक भाषांमध्ये गाणी गायली (Legendary Singer Suman Kalyanpur Songs)

त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक हिट गाण्यांना आपला आवाज दिलाय. आजही श्रोते त्यांचं गाणं आवडीनं ऐकतात. 'शराबी शराबी ये सावन का मौसम', 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे', 'ना ना करते प्यार', 'ना तुम हमें जानो', 'परबतों के पेड़ों पर' असे अनेक हिट हिंदी सिनेमातील गाण्यांना त्यांनी आवाज दिला. तर, 'निंबोणिच्या झाडा मागे' यांसारख्या मराठी अजरामर गाण्यांना आपला सुरेल स्वर दिला.

मोहम्मद रफी यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली.  त्यांच्या निधनाची बातमी पसरताच संगीत क्षेत्रात दु:खाचा डोंगर कोसळला.  त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत  1954 साली 'दरवाजा' सिनेमासाठी पार्श्वगायन केले.  सुरुवातीला त्यांचा आवाज लता मंगेशकर यांच्याशी साम्य असल्यामुळे, काही संगीतकारांनी त्यांना 'दुसरी लता' म्हणून कौतुक केले.   केवळ हिंदी आणि मराठी नसून, त्यांनी   गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी या भाषांतही त्यांनी गाणी गायिलेली आहेत.

सुमन कल्याणपूर यांची काही हिट हिंदी गाणी

"साथी मेरे साथी" (वीराना)

आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे (ब्रह्मचारी) 

"छोडो, छोडो मोरी बैयाँ" (मिया बीवी राझी)

"दिल गम से जल रहा" (शमा)

" यूँ ही दिल ने चाहा था" (दिल ही तो है)

"बुझा दिये हैं" (शगुन)

"मेरे संग गा" (जानवर)

"मेरे महबूब ना जा" (नूर महल)

"तुम अगर आ सको तो"

आणि "ज़िंदगी डूब गई दर्द के तूफानों में" 

"ज़िंदगी इम्तिहान लेती है" (नसीब)

सुमन कल्याणपूर यांची टॉप मराठी गाणी

निंबोणीच्या झाडामागे 

सांग कधी कळणार तुला

अरे संसार संसार

केतकीच्या बनी तिथे नाचला मोर

एक तरी सूर जाणे

थांबली बहिणाई दारी

नाविका रे वारा वाहे रे

भातुकलीचा खेळ मांडिला

अक्रुरा नको नेऊ माधवा

आकाश पांघरुनी

महत्त्वाच्या इतर बातम्या:

नऊवारी सोडली अन् अभिनेत्री गावभर फिरू लागली; 'फॉरेनच्या पाटलीण'चं वागणं पाहून सगळेच चक्रावले

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.