विधान परिषद निवडणूक 2026: राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस (Deadline) असताना, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पुण्यातील ‘जिजाई’ (Jijai) या निवासस्थानी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. रविवारी रात्री मॅरेथॉन बैठकीत विक्रम काकडे (Vikram Kakde) यांचे नाव निश्चित झाल्याची जोरदार चर्चा असताना, आज सकाळी ऐनवेळी त्यांना ‘एबी फॉर्म’ (AB Form) न मिळाल्याने सस्पेन्स वाढला होता. या पार्श्वभूमीवर, आता विक्रम काकडे स्वतः आणि अनेक ज्येष्ठ नेते ‘जिजाई’ बंगल्यावर पोहोचले असून गेल्या एक तासापासून अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे.
उमेदवारीचा पेच सोडवण्यासाठी सध्या सुरू असलेल्या या हायव्होल्टेज बैठकीला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), पार्थ पवार (Parth Pawar) आणि जय पवार (Jay Pawar) उपस्थित आहेत. विशेष म्हणजे, राज्याचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) हे देखील तातडीने ‘जिजाई’ बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आमदार सुनील शेळके (Sunil Shelke), आमदार अनिल पाटील, आमदार शंकर मांडेकर, आमदार चेतन तुपे, विलास लांडे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित असून, पुणे विधान परिषदेची अधिकृत उमेदवारी विक्रम काकडे यांनाच द्यायची की ऐनवेळी दुसरा कोणताही राजकीय निर्णय घ्यायचा, यावर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या जागेसाठी अजितदादा गटातील अनेक नेते इच्छुक होते. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच (NCP) राहावी यासाठी स्थानिक नेते आग्रही होते. अखेर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या एका फोननंतर या जागेवरील राष्ट्रवादीचा दावा निश्चित झाला. मुख्यमंत्र्यांनी विक्रम काकडे यांच्या नावाला ‘ग्रीन सिग्नल’ (Green Signal) दिल्यानंतर रविवारी रात्री साडेआठ ते रात्री दीड वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आज सकाळ उजाडली तरी त्यांच्यापर्यंत अधिकृत ‘एबी फॉर्म’ न पोहोचल्याने सस्पेन्स वाढला आहे.
आज दुपारी 3 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम वेळ असल्यामुळे ‘जिजाई’ बंगल्यावरील या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत अखेरच्या क्षणी विक्रम काकडे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होऊन त्यांना ‘एबी फॉर्म’ सुपूर्द केला जातो, की राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऐनवेळी कोणताही दुसरा मोठा ‘ट्विस्ट’ पाहायला मिळतो, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा