प्रसिद्ध सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरचा मृत्यू
23 व्या वर्षी कंटेंट क्रिएटरने घेतला अखेरचा श्वास
प्राण्यांवरील अपार प्रेमामुळे सोशल मीडियावर लोकप्रिय
ग्रामीण जीवनावर आधारित व्हिडिओ आणि प्राण्यांवरील अपार प्रेमामुळे विशेष ओळखली जाणारी लोकप्रिय सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर सायनी चक्रवर्ती हिचा मृत्यू झाला. वयाच्या २३ वर्षी सायनीने अखेरचा श्वास घेतला. पश्चिम बंगालमधील हुगळी येथे सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरचे निधन झाले. तिच्या या अचानक निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
न्यूज18 च्या वृ्त्तानुसार, पोलिसांच्या मते, मोगरा येथील 'गजघंटा डेपाडा' भागात राहणाऱ्या सायनीने आत्महत्या केली आहे. पोलिसांना सायनीचा मृतदेह तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळी कोणतीही 'आत्महत्या चिठ्ठी' (suicide note) आढळून आली नाही. गुरुवारी सायनीचा मृतदेह तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मोगरा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी चिन्सुरा इमामपारा रुग्णालयातपाठवला.
View this post on Instagram
पोलिसांनी सांगितले की, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व संभाव्य बाजू तपासल्या जात आहेत. सायनी बागती कॉलेजची माजी विद्यार्थिनी होती आणि तिने नुकतीच एलएलबीची पदवी पूर्ण केली होती. सायनी कंटेंट क्रिएशनमुळे ऑनलाइन जगात लोकप्रिय झाली. साधा स्वभाव, प्राण्यांवरील प्रेम-माया आणि आनंदी व्यक्तिमत्वाने तिने प्रेक्षकांना आपल केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी, चाहत्यांनी सायनी चक्रवर्तीवर श्रद्धांजली वाहिली आहे.
Anushka Sharma : RCB च्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत बेभान होऊन नाचली, मिसेस कोहलींचा आनंद गगनात मावेना | VIDEO