Pimpri-Pune Liquor Poisoning Crime : पुणे/पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूचे तांडव सुरू आहे, आत्तापर्यंत 22 जणांचा बळी घेणारी ही विषारी दारू फुगेवाडीतच (Pimpri-Pune Liquor Poisoning) बनवली जात होती. कर्नेलसिंग विरका (सरदारजी), त्याची पत्नी इंदरजित विरका आणि मुलगा गुरुचरण उर्फ विक्की विरका यांनी बाहेरून आणलेल्या गावठी दारू (Pimpri-Pune Liquor Poisoning) घरातच २१५ लिटर घातक 'मिथेनॉल' मिसळल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. काही हजारांसाठी आरोपींनी अनेकांच्या जीवाशी खेळ केला. तर दुसरीकडे विषारी दारुकांडातील आरोपींना सीआयडीचं पथक पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत आलं असता दिसले अन फुगेवाडीतील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक बघायला मिळाला आहे. नागरिक थेट चप्पल, दगड, सिमेंट ब्लॉक घेऊन सरसावले होते. मात्र सीआयडी पथकाने वेळीच त्यांना रोखलं त्यामुळे मोठी घटना टाळली असल्याचे बोललं जात आहे. (Pimpri Crime liquor poisoning Crime Case)
Pimpri-Pune Liquor Poisoning Crime : आज्जी चप्पल घेऊन आरोपीच्या समोर उभ्या ठाकल्या, तर तरुणांनी सिमेंट ब्लॉक आणि दगडं..
विषारी दारुकांडातील आरोपींना घेऊन सीआयडीचं पथक पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत आलं असता या वेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचं बघायला मिळालंय. मृतांचे कुटुंबीय आणि नागरिक यावेळी चांगलेच संतापले. एक आज्जी चप्पल घेऊन आरोपीच्या समोर उभ्या ठाकल्या, तर तरुणांनी सिमेंट ब्लॉक आणि दगडं घेऊन आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीआयडी पथकाने आणि पोलिसांनी वेळीचं या सर्वांना रोखलं, त्यामुळं संतापलेले कुटुंबीय आणि नागरिकांच्या तावडीतून सुटला. सीआयडीच्या पथकाने आरोपींना पंचनामा आणि तपास कामासाठी फुगेवाडीत आणलं होतं. त्यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. दरम्यान, सीआयडीचं पथक पंचनामा आणि तपास करुन परतत असताना घडलेला हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय.
Pimpri Crime liquor poisoning: आरोपींची नावे
१ . योगेश वाशखेडे
२. राधेशाम प्रजापती
3. कर्नलसिंह विरखा
4. गुरमितसिंह विरखा
5. कल्पेश अग्रवाल
6. अरिहंत धोत्रे
7. आकाश जाधव
8. अशोक हांडे
Pimpri-Pune Liquor Poisoning: नेमकं प्रकरण काय?
पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात अनेक नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने संपूर्ण परिसरात घबराट आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. बंदी असलेली हातभट्टीची गावठी ( विषारी ) दारू प्यायल्यानेच या नागरिकांचा बळी गेल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणावरून आता राजकीय वातावरणही तापले असून, अशा अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. परिसरात अवैध हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा घटनांकडे दुर्लक्ष करणारे पिंपरी-चिंचवड पोलीस कधी जागे होणार ? असा संतप्त सवाल उपस्थित करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर योगेश बहल यांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे. स्थानिक आणि लोकप्रतिनिधींकडून विषारी दारूचा उघड आरोप केला जात असताना, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मात्र वेगळा दावा केला आहे.