पुणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त आणि बेकायदेशीर अन्नपदार्थांवर मोठी कारवाई केली आहे. आंबेगाव आणि खेड तालुक्यातील पाच ठिकाणी धाड टाकून तब्बल १९ लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये गुटखा, पानमसाला, अप्रमाणित सुपारी तसेच संशयित अन्नपदार्थांचा समावेश आहे. काही आस्थापना विनापरवाना व्यवसाय करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.