बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांच्या आईचे 25 लाखांचे दागिने घरातूनच लंपास; खळबळजनक प्रकार उघड
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 02, 2026 10:13 AM

Raveena Tandon Mother Jewelry Worth 25 Lakhs Stolen: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्री रवीना टंडन (Actress Raveena Tandon) हिच्या आईचे 25 लाखांचे दागिने चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबाचा विश्वास संपादन करुन तिच्या आईचे सुमारे 25 लाख रुपये किमतीचे दागिने आणि महागडी घड्याळं चोरण्यात आली आहेत. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून, प्रकरणाची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.                                                                                     

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करून त्यांच्या आईचे सुमारे 25 लाख रुपये किमतीचे दागिने आणि महागडी घड्याळे चोरल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी 47 वर्षीय रशी छाब्रिया हिला अटक केली आहे.                  

नेमकं घडलं काय? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला 2020 पासून टंडन कुटुंबाच्या संपर्कात होती आणि रवीना टंडन यांच्या आईची देखभाल करण्यासाठी घरात ये-जा करत होती. घरातील तिजोरी फोडून सोन्या-हिऱ्याचे दागिने आणि दोन महागडी घड्याळं चोरी केल्याचा तिच्यावर आरोप आहे.                 

दागिने हरवल्याचं लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी चौकशी केली असता, आरोपीनं सुरुवातीला आरोप फेटाळले. मात्र, पोलीस तक्रारीनंतर तिला अटक करण्यात आली. चोरी केलेली काही घड्याळं जप्त करण्यात आली असून उर्वरित दागिन्यांचा शोध सुरू आहे. जुहू पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.                

मीडिया रिपोर्टनुसार, चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये सोन्या-हिऱ्याचे मौल्यवान दागिने असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, दोन लग्झरी घड्याळांचाही समावेश आहे. या घटनेबाबत रवीना टंडन किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, या घटनेची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनीही चिंता व्यक्त केली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस तपासातून पुढील काही दिवसांत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. 

 

Hollywood Actor Brad Pitt Going To Marry GF Ramon Ines: 33 वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत चार वर्षांचं रिलेशनशिप; दुसरं लग्न करणार 62 वर्षांचा सुप्रसिद्ध अभिनेता? 

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.