कॉकरोच जनता पार्टीबाबत अंकिता वालावलकरला काय वाटतं? कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच म्हणाली...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 03, 2026 01:13 PM

Ankita Walawalkar On Cockroach Janata Party: 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) ही 2026 मध्ये सोशल मीडियावर उदयास आलेली एक व्यंगात्मक (Satirical) डिजिटल चळवळ. सरन्यायाधीश यांनी युवकांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा धागा पडकत कॉकरोच जनता पार्टी (Cockroach Janata Party) नावानं एक सोशल मिडिया अकाऊंट सुरू करण्यात आलं आणि पाहता पाहता देशभरातील युवकांनी या पार्टीला मोठा पाठींबा दर्शवला.  बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, शिक्षण व्यवस्था आणि तरुणांच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी या चळवळीची सुरुवात करण्यात आली. आता सोशल मीडियावर अल्पावधीत धुमाकूळ घालणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके लवकरच भारतात परतणार  आहेत. 

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Education Minister Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 6 जून रोजी भारतात परत येणार असल्याची घोषणा दीपकेंनी केलीय. NEET पेपर लीक (NEET Paper Leak Case) प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला असून या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्विकारून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन याचिकेला आतापर्यंत सुमारे 8 लाख विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय. अशातच प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) कोकण हार्टेड गर्ल (Konkan Hearted Girl) म्हणजेच, अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) हिनं कॉकरोच जनता पार्टीबाबत तिचं मत व्यक्त केलं आहे. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना अंकिता वालावलकर हिला कॉकरोच जनता पार्टीबाबत तिचं मत विचारलं. यावर तिनं स्पष्ट आणि रोखठोक भाष्य केलं आहे. माझ्याकडे माझा आवाज आहे, मला जर काही वाटलंच, सिस्टिमच्या विरोधात उभं राहायचंय, मी स्वतः उभी राहू शकते... माझ्याकडे माझा प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे अशा काहीतरी वेगळ्या पार्टीमध्ये मी जॉईन होतेय आणि मग मी करतेय, असं नाही, असं अंकिता वालावलकर म्हणाली. 

कॉकरोच जनता पार्टीबाबत बोलताना अंकिता वालावलकर नेमकं काय म्हणाली? (Ankita Walawalkar On Cockroach Janata Party)

नुकतीच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच, अंकिता वालावलकर हिनं 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना अंकिता वालावलकरनं कॉकरोच जनता पार्टीबाबत आपलं मत व्यक्त केलंय. सदसद विवेक बुद्धी वापरुन आपल्याला जे योग्य वाटतंय ते करणं आणि ट्रेंड फॉलो न करणं, हे खूप चांगलंय, असं अंकिता वालावलकर म्हणाली. 

कॉकरोच जनता पार्टीबाबत बोलताना अंकिता वालावलकर म्हणाली की, "प्रत्येकाचा स्वतःचा एक आवाज आहे आणि आता आपल्यावरती होणाऱ्या अन्यायासाठी कुणीतरी दुसऱ्यानं उभं राहण्याची आपल्याला गरज नाहीय... ज्याच्यावरती अन्याय होतो, तो जरी स्वतःहून बोलला तरी त्याला सपोर्ट करणारी लोक आहेत... पण आपलं जे युथ आहे, किंवा काही काही गोष्टी कशा चालतात, हे आपल्याला काही माहीत नसतं की त्यामागे काय राजकारण आहे? किंवा आणि काय आहे... सदसद विवेक बुद्धी वापरुन आपल्याला जे योग्य वाटतंय ते करणं आणि ट्रेंड फॉलो न करणं, हे खूप चांगलंय..."

"कॉकरोच जनता पार्टीबाबत मी हल्लीच ऐकलं, मला फारसं माहीत नव्हतं की, असं काहीतरी आहे... पण मी फार त्यामध्ये घुसलेच नाही, कारण मला त्याबद्दल फारसं काही वाटत नाही... माझ्याकडे माझा आवाज आहे, मला जर काही वाटलंच, सिस्टिमच्या विरोधात उभं राहायचंय, मी स्वतः उभी राहू शकते... माझ्याकडे माझा प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे अशा काहीतरी वेगळ्या पार्टीमध्ये मी जॉईन होतेय आणि मग मी करतेय, असं नाही... मी आजही सरकारला प्रश्न विचारू शकते... मला वाटतं की, त्या पुण्याच्या केसमध्येही मी सरकारला थेट विचारलेलं, आम्हाला कधी एक कायदा मिळणार...? त्यामुळे आपली विवेक बुद्धी वापरुन, आपल्यासाठी आपणच उभं राहणं, हे जास्त मला योग्य वाटतं...", असं अंकिता वालावलकर म्हणाली. 

Vaibhav Mangale Post On Suman Kalyanpur: 'सुमनताई लताबाईंसारखं गायच्या, हेच त्यांचं दुर्भाग्य होतं...'; सुमन कल्याणपूरांच्या निधनानंतर वैभव मांगले यांची पोस्ट व्हायरल

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.