Vadar Samaj News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यात आला असून विधान परिषद निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने लगेच घोषणा होणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितलंय. असं असताना वडार समाजासाठी फडणवीस सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वडार समाजातील (Vadar Community) बेघर कुटुंबांसाठी घरकुल योजनेच्या निधीत वाढ करणार, असे निर्देश ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी दिले आहे. दरम्यान मंत्री अतुल सावेंकडून या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.
Atul Save : बेघर कुटुंबांसाठी घरकुल योजनेच्या निधीत वाढ; मंत्री अतुल सावेंकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
मिळालेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) 2.5 लाखांसोबत अतिरिक्त 2 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव असून नवीन घरकुलासाठी अतिरिक्त 2 लाख रुपये देण्याची देखील तरतूद करणार असल्याची माहिती आहे. कामगार कल्याण मंडळामार्फत वडार समाजातील बांधकाम कामगारांना याचा लाभ होणार आहे. दरम्यान, संबंधित विभागाने तात्काळ कृती आराखडा तयार करण्याचे मंत्री सावेंनी संबंधित विभागाला निर्देश दिले आहे. जिल्हापरिषद, महानगरपालिका आणि पंचायत समिती स्तरावरील काही कामे वडार समाजासाठी राखीव ठेवण्याचा विचार यावेळी करण्यात आला आहे.
Vadar Samaj News : वडार समाजातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यात भव्य वसतिगृह उभारण्याबाबतही चर्चा
दरम्यान, वडार समाजातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यात भव्य वसतिगृह उभारण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रे सुलभपणे मिळण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी देखील माहिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या