Satish Sanpal Dubai Billionaire Success Story: सध्या नेटफ्लिक्सवरचा (Netflix) रियॅलिटी शो 'देसी ब्लिंग' (Reality Show Desi Bling) भलताच चर्चेत आहे. या शोमध्ये आलेल्या एका अब्जाधीश जोडप्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. नेटफ्लिक्सवर ट्रेंडिगमध्ये (Netflix Trend) असलेल्या 'देसी ब्लिंग'मध्ये (Desi Bling) दुबईत (Dubai) राहणारं एक जोडपं आलंय, ज्यांच्या चर्चा संपूर्ण देशभरात रंगल्या आहेत. हे जोडपं दुबईत असलेल्या पण जगातल्या सर्वात उंच इमारतींमध्ये समाविष्ट होणाऱ्या बुर्ज खलिफामध्ये राहतं. तर या जोडप्यानं नुकतीच आपल्या एका वर्षाच्या मुलीला कोट्यवधींची कस्टमाइज्ड रॉल्स-रॉयस (Rolls-Royce Cars) गिफ्ट केलीय, ज्यावर तिच्या नावाची सुरुवातीची अक्षरं लिहिली आहेत. या जोडप्याची श्रीमंती पाहून अख्ख्या देशाचे डोळे दिपले आहेत. पण, तुम्ही जर त्यांच्या श्रीमंतीच्या शिखरापर्यंत पोहोचण्याची कहाणी ऐकलीत ना, तर तुम्हीही हैराण व्हाल.
मध्य प्रदेशातील जबलपूरचे मूळ रहिवासी आणि सध्या दुबईमध्ये स्थायिक असलेले हे भारतीय अब्जाधीश, नेटफ्लिक्सवरील Desi Bling या शोमधील सर्वाधिक चर्चेत असलेला चेहरा म्हणून समोर आले आहेत. आणि इंटरनेटवर त्यांच्या लाईफस्टाईलच्या चर्चा काही केल्या थांबत नाहीयेत. त्यांची लहान मुलगी, इसाबेला सनपाल, 24-कॅरेट सोन्याच्या चमचे-काट्यांचा वापर करून जेवण करते. आणि तिच्या पहिल्या वाढदिवसाचं काय सांगाल? त्या सोहळ्याला 'ए-लिस्ट'मधील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती; या वाढदिवसाच्या पार्टीत छतावरून खाली येणारा केक हे एक खास आकर्षण होतं, तसेच सोन्याच्या रथातून केलेली तिची भव्य एन्ट्रीही विशेष लक्षवेधी ठरली होती.
View this post on Instagram
पण नक्की हे सतीश सनपाल आहेत तरी कोण? भारतातील एका छोट्याशा गावातून आलेल्या, स्वतःच्या कर्तृत्वावर यशाचे शिखर गाठणाऱ्या या दुबईस्थित अब्जाधीशानं इतकं विशाल साम्राज्य नेमकं कसं उभारलं? याचं उत्तर वरकरणी दिसतंय त्यापेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीचं आहे.
सतीश सनपाल यांची कहाणी एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही. मध्य प्रदेशातील जबलपूरच्या रस्त्यांवरुन आपला प्रवास सुरू करत, त्यांनी आज जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवलं आहे. जबलपूरच्या एका छोट्याशा गावात राहणारा सर्वसाधारण व्यक्ती आज जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या 'बुर्ज खलिफा'मध्ये राहतो. सतीश सनपाल यांच्या शिक्षणाबाबत बोलायचं झालं तर, त्यांचं शिक्षण केवळ आठवीपर्यंतच झालंय. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी 50 हजार भांडवलावर एक किराणा दुकान सुरू केलं. पण, या व्यावसायात त्यांना फारसं यश आलं नाही. अखेर त्यांनी केवळ 80 हजार रुपये घेतले आणि भारत सोडून दुबईला निघून गेले आणि तिथेच त्यांच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली.
जबलपूरमध्ये जन्मलेले आणि वारसाहक्काने कोणतीही संपत्ती न मिळालेले सतीश सनपाल हे दुबईस्थित अब्जाधीश आहेत. सनपाल यांनी आठवी इयत्तेनंतरच शाळा सोडली आणि अगदी लहान वयातच काम करण्यास सुरुवात केली. भारतात एका छोट्या किराणा दुकानातून आपल्या कामाची सुरुवात केल्यानंतर, ते साधारणपणे 80,000 रुपये सोबत घेऊन दुबईला गेले आणि त्यांनी सोन्याच्या व्यापाराच्या व्यवसायात (gold trading) पदार्पण केले.
View this post on Instagram
दुबईमध्ये, त्यांच्या 'ANAX Holdings' समूहानं रिअल इस्टेट आणि शेअर बाजार या दोन्ही क्षेत्रांत आपलं वर्चस्व निर्माण केलं. आज, ते 8,000 कोटी रुपयांच्या साम्राज्याचे मालक आहेत. तर, त्यांच्या पत्नीचीच मालमत्ता 4 हजार कोटी आहे. त्यांची एक वर्षांची मुलगी आहे, जिला सोन्याची भांड्यांमध्ये जेवते, तर तिच्या पहिल्या वाढदिवसाला तिनं 24 कॅरेट सोन्याचे कपडे परिधान केलेले.
मीडिया रिपोर्टनुसार, सानपाल आणि त्यांची पत्नी तबिंदा यांची एकत्रित एकूण संपत्ती 1.5 अब्ज डॉलर्सपेक्षा (सुमारे 14,000 कोटी रुपये) अधिक आहे. सतीश सानपाल हे ANAX Holding चे संस्थापक आहेत. ही एक अशी व्यावसायिक साम्राज्य-संस्था आहे, जिचा विस्तार रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. विविध अहवालांनुसार, ANAX Holding चे मूल्यांकन 3 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे.
सनपाल कुटुंब बुर्ज खलिफामध्ये एका अत्यंत आलिशान घरात राहतं. दुबई हिल्समध्ये त्यांच्या मालकीचा भव्य व्हिला देखील आहे आणि सध्या ते 50,000 चौरस फुटांच्या भूखंडावर एक भव्य बंगला बांधत आहेत. 'देसी ब्लिंग' या रिॲलिटी शोमध्ये तबिंदा सनपाल हिनं दावा केला होता की, तिच्याकडे 40 किलो सोनं आहे आणि सतीश सनपाल तिला दरवर्षी धनत्रयोदशीला अंदाजे 3 किलो सोनं भेट देतात. या कुटुंबाकडे रोल्स-रॉइस गाड्यांचा ताफा, अंदाजे 35 कोटी किमतीची बुगाटी चिरॉन (Bugatti Chiron), एक खाजगी यॉट लग्झरी घड्याळं आणि डिझायनर एक्सेसरीज आहे.
एक खाजगी नौका, आलिशान घड्याळे आणि डिझायनर ॲक्सेसरीज आहेत. हा अब्जाधीश 2025 मध्ये पहिल्यांदा चर्चेत आला होता, जेव्हा त्यानं आपली एक वर्षाची मुलगी इसाबेला हिला 5.8 कोटी किमतीची कस्टमाइज्ड मेटॅलिक पिंक रोल्स-रॉइस फँटम गिफ्ट केलेली.
वाढदिवसाचा सोहळा 'अटलांटिस द रॉयल' हॉटेलमध्ये पार पडला, ज्यात आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान आणि नोरा फतेही यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी आपली कला सादर केली. या सोहळ्यादरम्यान, बेला सोनेरी रंगाचा ड्रेस आणि 24 कॅरेट सोन्याचे जॅकेट वेअर करून, राजकुमारीच्या थाटामाटातील रथातून शानदार प्रवेश करताना दिसली. ही गाडी खास यूकेमध्ये तयार करण्यात आली होती, मेटॅलिक पिंक एक्सटीरियर, पिंक-एंड-व्हाइट लेदर इंटीरियर, इसाबेलाच्या नावानं सुरुवातीच्या अक्षरांच्यामोनोक्रोम सीट्स आणि एक पर्सनलाइज्ड 'काँग्रेचुलेशन इसाबेला' नेमप्लेट समावेश होता.
ABP माझाच्या बातम्या LIVE...