अस्सं सासर सुरेख बाई! प्राजक्ता गायकवाडची 'पाठराखीण' मालिका पाहण्यासाठी सासरच्या अंगणात मोठी स्क्रिन
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 03, 2026 05:43 PM

Prajakta Gaikwad Pathrakhin Serial: 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajyarakshak Sambhaji) मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Marathi Actress Prajakta Gaikwad) सध्या तिच्या नव्या मालिकेमुळे चर्चेत आहे. प्राजक्तानं 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलेली. तेव्हापासून ती अवघ्या महाराष्ट्रात छत्रपतींची युवराज्ञी म्हणूनच ओळखली जाऊ लागली. आता प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिची नवी मालिका सुरू झाली आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या स्टार प्रवाहवरच्या 'पाठराखीण' मालिकेत प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

'पाठराखीण'चा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर प्राजक्ताचं तिच्या सासरच्या मंडळीकडून खास कौतुक करण्यात आलंय. प्राजक्ता गायकवाडनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत तिच्या सासरच्यांना आपल्या सुनबाईचं किती कौतुक केलंय, हे पहायला मिळतंय. सध्या सोशल मीडियावर प्राजक्तानं शेअर केलेला व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय.

प्राजक्ता गायकवाडनं शेअर केला VIDEO

व्हिडिओमध्ये प्राजक्ताच्या सासरच्या मंडळीनी घराच्या अंगणात एक मोठी स्क्रीन, प्रोजेक्टर लावलेला. त्या मोठ्या स्क्रिनवर प्राजक्ताच्या सासरच्या मंडळींनी त्यांच्या लाडक्या सुनेच्या 'पाठराखीण' मालिकेचा पहिला भाग सहकुटुंब सहपरिवार एकत्र पाहिला. याचा व्हिडीओ प्राजक्ता गायकवाड हिनंच शेअर केला असून व्हिडीओमध्ये दिसतंय की तिच्या सासरचं संपूर्ण कुटुंब कौतुकाने सुनेची मालिका पाहत आहेत. घराच्या अंगणात सगळं कुटुंब एकत्र बसून लाडक्या सुनेची मालिका पाहत होतं. एवढंच काय तर, प्राजक्ताची एन्ट्री होताच, सर्वांनी टाळ्या वाजवून आनंदही व्यक्त केला. प्राजक्तानं व्हिडीओ शेअर करत सुंदर कॅप्शनही लिहिलंय. कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "सूनेचे कष्ट आणि सासरच्यांना कौतूक..."प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. एवढंच काय तर, चाहत्यांनी प्राजक्ताच्या सासरच्या मंडळींचंही कौतुक केलंय.  

प्राजक्ता गायकवाडची 'पाठराखीण' ही मालिका 1 जून पासून स्टार प्रवाहवर सुरू झालीय. आदेश बांदेकर यांच्या निर्मिती संस्थेनं या मालिकेची निर्मिती केली आहे. दोन बहिणींची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. ही मालिका भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहिणींच्या घट्ट नात्यावर आणि त्यांच्या प्रवासावर आधारित आहे. कठीण प्रसंगात त्या एकमेकींच्या 'पाठराखीण' बनून कशा लढतात, हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. प्राजक्ता या मालिकेमुळे तब्बल 5 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलंय. 

Satish Sanpal Dubai Billionaire Success Story: बुर्ज खलीफामध्ये घर, बायकोकडे 40 किलो सोनं, एक वर्षाच्या मुलीसाठी कस्टमाइज्ड रॉल्स-रॉयस अन्...; दुबईत अब्जावधींचं साम्राज्य उभारणारा सतीश सनपाल कोण?

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.