झगमगाटाच्या दुनिये मागे काळे सत्य सपलेले असते असे बोलले जाते. अनेकदा कलाकारांनी शेअर केलेल्या त्यांच्या अनुभवांमुळे हे सत्य असल्याचा देखील विश्वास. इंडस्ट्रीमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटना सांगितल्या आहेत. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचा अनुभव सांगितला आहे.
अभिनेत्री म्हणून थोडी कमी ओळख मिळाली याबद्दल बोलताना मेघा घाडगे म्हणाली, “कामं आली पण त्या दरम्यान 1-2 जण अशी भेटली मी त्यांची नावं घेऊ शकत नाही. मी टू प्रकरण, कॉम्प्रोमाइजच्या गोष्टी इनडायरेक्टली माझ्याबद्दल खूप बोललं गेलं. माझं इंडस्ट्रीत बॅकग्राऊंड नाहीये. कोणी ओळखीचं नाहीये. योग्य मार्ग दाखवणारी खूप कमी लोकं होती. पण त्यावेळेस या लोकांशी कसं डील करायचं हे मला कळलं नाही. मी फक्त लांब सरकत गेले.”
एका पार्टीत मेघाला धक्कादायक अनुभव आला आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली, “माझे केस पकडलेले पार्टीमध्ये, शिव्या दिल्या. ‘मला माहितीये तू कसली आहेस स्वत:ला शहाणी समजतेय’. माझी मैत्रीण मध्ये पडलेली. ती म्हणाली अरे काय करतोस. काय बोलू मी या माणसाला दारू पिऊन तराट होता.”
पुढे मेघा म्हणाली, “मी निघून आले तिथून. कोणाला जाऊन जाब विचारणार, मी पहिल्यांदाच गेले पार्टीला. सगळे नाचतायत आम्हीपण नाचतोय. आपण चेहऱ्यानं ओळखतो आर्टिस्टना. काय ग्रेट आर्टिस्ट आहे. छान नाचतायत एकमेकांबरोबर आणि अचानक त्याने केस पकडले. अचानक मला शिव्या घालायला लागला. मला कशाबद्दल बोलतोय हेच कळत नाहीये.”