भारताच्या सिनियर क्रिकेट संघाचं आंतरराष्ट्रीय वेळापत्रक आधीपासूनच व्यस्त आहे. त्यात आता आणखी एक मोठा दौरा जोडला गेलाय. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयने ऑक्टोंबर-नोव्हेंबर 2026 मध्ये होणाऱ्या टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक शेड्यूल जारी केलं आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंडमध्ये एकूण 12 सामने होतील. यात 5 टी20, 5 वनडे आणि 2 कसोटी सामने आहेत. टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात 22 ऑक्टोंबर 2026 ख्राइस्टचर्च पासून होईल. टीम इंडिया इथे पहिला टी20 सामना खेळेल. टी 20 सीरीजचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होतील. त्यानंतर दोन्ही टीम्समध्ये पाच वनडे सामन्यांची सीरीज होईल. पहिला वनडे सामना 4 नोव्हेंबरला ऑकलंडच्या ईडन पार्कमध्ये होईल.
वनडेसीरीजचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता सुरु होतील. ऑकलंड, वेलिंग्टन, हॅमिल्टन आणि माउंट माउंगानुई येथे हे सामने होतील. हा ऐतिहासिक दौरा ऑक्टोंबर 2026 मध्ये सुरु होईल अशी माहिती बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मिडिया पोस्टमधून दिली आहे. पाच टी20,पाच वनडे आणि दोन टेस्ट मॅच आहेत. टेस्ट सीरीजचे सामने 19 आणि 27 नोव्हेंबरपासून सुरु होतील.
भारतीय टीमसाठी हा दौरा खूप महत्वपूर्ण मानला जात आहे. न्यूझीलंडमधील वातावरण हे नेहमीच परदेशातील संघांसाठी आव्हानात्मक असतं. या सीरीजच्या माध्यमातून खेळाडूंची तयारी आणि टीम नियोजन परखण्याची मोठी संधी मिळेल.
भारत विरुद्ध न्यूजीलंड 2026 : टी20 सीरीज शेड्यूल, सर्व सामने दुपारी 1:30 वाजता
पहिली टी 20 – 22 ऑक्टोंबर ख्राइस्टचर्च (हेगले ओवल)
दुसरी टी 20 – 24 ऑक्टोंबर ख्राइस्टचर्च (हेगले ओवल)
तिसरी टी 20 – 27 ऑक्टोंबर वेलिंगटन (एचएनआरवाई स्टेडियम)
चौथी टी 20 – 30 ऑक्टोंबर ऑकलंड (ईडन पार्क)
पाचवी टी 20 – 1 नोव्हेंबर हॅमिल्टन (सेडन पार्क)
भारत विरुद्ध न्यूजीलंड 2026 : वनडे सीरीज शेड्यूल, सर्व सामने सकाळी 8.30 वाजता
पहिली वनडे – 4 नोव्हेंबर ऑकलंड (ईडन पार्क)
दुसरी वनडे – 7 नोव्हेंबर वेलिंगटन (एचएनआरवाई स्टेडियम)
तिसरी वनडे – 10 नोव्हेंबर ह२मिल्टन (सेडन पार्क)
चौथी वनडे – 13 नोव्हेंबर माउंट माउंगानुई (बे ओवल)
पाचवाी वनडे – 15 नोव्हेंबर माउंट माउंगानुई (बे ओवल)
भारत विरुद्ध न्यूजीलंड 2026 : टेस्ट सीरीज शेड्यूल, सर्व सामने सकाळी 4.30 वाजता
पहिला कसोटी सामना : 19 ते 23 नोव्हेंबर वेलिंगटन (बेसिन रिजर्व)
दुसरा कसोटी सामना : 27 ते 1 डिसेंबर ख्राइस्टचर्च (हेगले ओवल)