Karnataka Chief Minister : हातात संविधान घेऊन डी.के. शिवकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; जी. परमेश्वर बनले उपमुख्यमंत्री
esakal June 03, 2026 08:45 PM

DK Shivakumar Sworn In As Karnataka CM : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी आज बुधवारी (ता.३) कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, डॉ. जी. परमेश्वर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

बंगळूर येथील विधानसौध संकुलातील 'ग्लास हाऊस'मध्ये आयोजित भव्य समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी या दोन्ही नेत्यांना शपथ दिली. या प्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे इतर अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.