वयाच्या साठीत अमीर खान तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार; 61 व्या वर्षी गौरी स्प्रॅटसोबत संसार थाटणार, तारीख, मुहूर्त ठरला
abp majha web team June 03, 2026 09:13 PM

Amir khan Third Marriage Date Confirm:  बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खानच्या (Amir Khan) आणि प्रेयसी गौरी स्प्रेटच्या (Gauri Sprat) नात्याची कायमच बॉलीवूडमध्ये चर्चा रंगलेली असते.  वर्षभरापूर्वी अमीर खानने गौरीची सर्वांशी ओळख करून दिल्यापासून चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली होती आमिरच्या लग्नाची. अमीरनं अनेकदा गौरी सोबत तो सिरीयस रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितल्यानंतर अखेर तो त्यांच्या नात्याला नवं नाव देण्याच्या तयारीत आहे. वयाच्या 61 व्या वर्षी अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. हॉटरफ्लायरने बुधवारी केलेल्या instagram पोस्टवर यासंदर्भात माहिती दिली आहे. अमीर खान जुलै महिन्यात त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅट सोबत लग्न करणार आहे. त्या दोघांच्या लग्नाची तारीखही समोर आली असून जवळचे मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत खासगी व औपचारिकपणे लग्न करणार आहे. (Bollywood News)

Amir Khan Marriage Date: आमिर खानच्या लग्नाची तारीख समोर

बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता आमिर खान आणि प्रेयसी गौरी स्प्रॅट एका खासगी समारंभात विवाहबद्ध होणार आहेत. या दोघांच्या लग्नाची तारीखही समोर आली असून 5 जुलैला जवळच्या कुटुंबीयांसोबत आणि काही जवळच्या मित्रांचे उपस्थितीत ते त्यांच्या राहत्या घरीच नोंदणी पद्धतीने त्यांच्या नात्याला औपचारिक रूप देणार आहेत. अमीर आणि गौरी गेल्या सुमारे वर्षभरापेक्षा अधिक काळापासून आनंदाने एकत्र राहत आहेत.

अभिनेता आमिर खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. त्याचे या आधीचे दोन्ही घटस्फोट आणि गौरी स्प्रॅटशी असलेल्या नात्याची कायमच चर्चा झाली आहे. खरंतर याआधीच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्याने गौरी स्प्रॅटबाबत खुलासा केला होता. गौरी आणि मी एकमेकांसोबत खूप सिरीयस आहोत.आम्ही एका कमिटेड स्पेसमध्ये आहोत. आणि तुम्हाला माहितीये, आम्ही पार्टनर्स आहोत.आम्ही एकत्र आहोत. लग्न एक अशी गोष्ट आहे, की मी गौरीची माझ्या मनात एक लग्न कधीच केलंय. मग आता आम्ही हे लग्न फॉर्मलाइज करणार की नाही ..हे असं काहीतरी आहे ज्याबाबत आम्ही जसजसा वेळ पुढे जाईल तसा निर्णय घेऊ ' असं अमीर म्हणाला होता.

Amir Khan: अमीर खान करणार  तिसऱ्यांदा लग्न 

आमिर खाननं पहिल्यांदा रीना दत्तासोबत आपली लग्नगाठ बांधली. रीनाशी घटस्फोट झाल्यानंतर आमिर खाननं किरण रावशी लग्न केलं. पण, आमिरचं दुसरं लग्नही फार काळ टिकलं नाही. आमिर आणि किरण यांनी आपसी सहमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अशातच आता किरण रावला घटस्फोट दिल्यानंतर आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात पडला. आमिर खाननं स्वतः मीडियासमोर आपली गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची सर्वांना ओळख करुन दिली. तसेच, आमिरनं अनेकदा गौरीसोबत तो सीरिअस रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं आणि आता तो तिच्याशी लग्नही करणार आहे.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.