Sanjay Raut : आधी मातोश्रीवर या, पश्चात्ताप करा आणि चर्चा करा, मगच एकत्र… संजय राऊत यांचं सलग दुसऱ्या दिवशी आवतन; काय घडणार?
Tv9 Marathi June 04, 2026 03:48 AM

दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत अशी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी नुकतीच इच्छा व्यक्त केली होती. भाजपचं समोर असलेलं आवाहन लक्षात घेऊन त्यांनी ही भावना व्यक्त केली होती. आत सलग दुसऱ्यादिवशी खासदार संजय राऊत यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं आहे. “दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी आधी मातोश्री वर या आणि पश्चाताप व्यक्त करा. आधी येऊ द्या आल्यावर बघू” असं राऊत म्हणाले. राज्यात विधान परिषदेच्या 17 जगासाठी निवडणूक होत आहे. काही अपवाद वगळता आम्ही निवडणूक लढवत आहोत. बिनविरोध होऊ नये यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत” असं राऊत म्हणाले. “महाविकास आघाडीने आपले उमेदवार उभे केले आहेत. रणधुमाळी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये असते. विधानपरिषद गोपनीय पद्धतीने होते, नाशिक मध्ये काय होतं ते आपण पाहुयात” असं राऊत म्हणाले.

“मी इतर कामांमुळे नाशिक मध्ये सक्रिय नव्हतो. दोन जणांनी अर्ज घेतले होते. घोडेबाजार होऊ नये असं मिर्लेकर यांच म्हणणं होतं. राज्यात घोडेबाजार सुरू झाला आहे. आमच्याकडे जे मत आहे, ते कुणाला द्यायचं यासंदर्भात उद्धव ठाकरे निर्णय घेतील” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. “उमेदवार दिले नाही म्हणून आमची चूक नाही. मतांमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे कोणी इच्छुक पुढे आले नाहीत. ही निवडणूक फक्त नाशिक पुरती नाही. संपूर्ण राज्यात आहे. मिर्लेकर यांची चूक नाही. बंडखोरी मुळे नगरसेवकांना आर्थिक बळ मिळेल” असंराऊतम्हणाले.

राऊत यांनी पहिल्या क्रमांकाचा शत्रू सांगितला

“उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून नाशिक मध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय झाला आहे. तुम्हाला निकालावेळी कळेल आम्ही कुणाला मतदान केले आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू शिंदे गट आहे” हे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या घोषणा फसवणूक असतात. सरसकट कर्ज माफी दिली पाहीजे. प्रत्येक योजनेत तुम्ही लोकांना फसवत आहात. शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करू नये. रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि मोदींच्या सभेला जाण बंद केले तर आपोआप काही प्रश्न सुटतील” असा राऊत यांनी दावा केला.

“विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत आहे असं रोहित पवार बोलले होते. त्यांच्या मताशी मी सहमत आहे” असं राऊत म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.