गुजरातच्या सुरत येथे महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बस एकमेकांवर धडकून आग लागली आणि भीषण अपगात घडला. एक बस रस्त्यावर कोसळली आणि तिने क्षणात पेट घेतला. डिझेलची टाकी फुटलन्याने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या दुर्दैवी अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झालेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र काही जखमींची प्रकृती गंभीर आहे, मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्य सरकारने मृतांच्या वारसांना 10लाखांची तर पीएमओने 2 लाख रुपयांची मतदही जाहीर केली. या अपघातामुळे मृतांच्या नातेवाईकांवर, कुटुंबीयांवर शोककळा पसली असून त्यांच्या दु:खाला अंतच नाही.
मुलीचा वाढदिवस साजरा करून घरी जात होते पण..
या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये पाचोरा बस स्थानकातून बसमध्ये बसलेल्यादोघांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मधुकर यशवंत पाटील व त्यांच्या पत्नी अर्चना मधुकर पाटील असे मृत्यू झालेल्या दांपत्याचे नाव आहे. पाटील दांपच्या हे त्यांच्या पाचोरा येथे त्यांच्या मुलीच्या वाढदिवसासाठी आले होते. लेकीचा वाढदिवस साजरा करून ते सुरतकडे जात होते. पाचोरा स्थानकातून ते बसमध्येही बसले, पण घरीच पोहोचले नाही, वाटेतच त्यांना काळाने गाठलं. पाचोर येथून ज्या बसमध्ये ते बसले होते, त्याचत बसचा सुरतच्या उवा गावाजवळ अपघात झाला, ती पेटली आणि त्यात पाटील दांपत्यासह आणखी 7 जणांनी जीव गमावला,
दरम्यान प्रशासनाकडून पाटील दांपत्यांच्या मृत्यू बाबत माहिती देण्यात आली आहे. पण असं असलं तरी अद्यापही त्यांच्या मृतदेहाचा शोध लागलेला नसून डीएनए चाचणी केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली जाणार आहे.
एसटी चालकानेही गमावला जीव
7 जणांचा जीव घेतलेल्या या बस अपघातामध्ये जामनेर सुरत या एसटी बसचे चालक घनश्याम बरकले यांचा देखील मृत्यू झाला . सुरत येथील या भीषण बस अपघातात कु-हा पानांचे येथील बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घनश्याम यांच्या मृत्यूची माहिती मिळतात गावावर शोककळा पसरली. त्यांच्या नातेवाईकांच्या, कुटुंबियाच्या डोळ्यातील अश्रूंना खळ नाही. बसचालकाच्या घरी नातेवाईक मित्रमंडळी गावकरी यांची गर्दी झाली असून शोकाकुल वातावरण आहे.
घनश्याम बर्कले हे 2013 पासून एसटी महामंडळ मध्ये कार्यरत होते. त्यांच्या पत्नी, एक मुलगी, आई वडील असं कुटुंब आहे.. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला असूनलहानपणीचे मित्र आणि गावकऱ्यांनी त्यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला.