Karad Crime: सातबाऱ्यावर नाव नोंदविण्यासाठी लाच मागितली; महिला ग्राममहसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, एसीबीची कऱ्हाडमध्ये कारवाई
esakal June 04, 2026 10:45 AM

कऱ्हाड: वारस हक्काची नोंद करून देण्यासाठी अडीच हजारांची लाच स्वीकारताना चचेगाव येथील महिला ग्राममहसूल अधिकाऱ्यास (तलाठी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. अर्चना रामचंद्र गावडे (वय ४०) असे संबंधिताचे नाव असून, तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्त

तक्रारदाराच्या आजीच्या निधनानंतर तिच्या नावावरील चचेगाव येथील जमिनीच्या वारस नोंदीसाठी तक्रारदाराच्या वडिलांनी २९ जानेवारीला अर्ज केला होता. तक्रारदार त्याचा पाठपुरावा करत होते.

दरम्यान, वारस नोंद मंजूर करून सातबाऱ्यावर तक्रारदाराच्या वडिलांचे व चुलत्यांचे नाव नोंदविण्याचे काम केल्याच्या मोबदल्यात ग्राममहसूल अधिकारी गावडेने अडीच हजारांची लाच मागितली होती. याबाबत संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

Success Story: अंगणवाडी सेविकेच्या तिन्ही मुलांची सरकारी सेवेत भरारी; एक मंत्रालयात, दोघे मुंबई पोलिसांत, शेतकरी कुटुंबाची प्रेरणादायी यशोगाथा

त्याची पडताळणी करून आज सापळा रचून अर्चना गावडेना पंचांसमक्ष अडीच हजारांची लाच स्वीकारताना ‘लाचलुचपत’च्या पथकाने पकडले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक शैला कोरडे, पोलिस निरीक्षक सुनील पाटील, कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.